राज ठाकरेंना दिलासा; चौदा वर्षापूर्वीच्या प्रकरणातील अटक वॉरंट रद्द

वॉरंट हुकूम बजावूनही राज ठाकरे हजर न राहिल्याने न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावण्यात आले होते.
Raj-Thackeray
Raj-ThackerayTeam eSakal

इस्लामपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना 14 वर्षांपूर्वी कोकरूड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दिलासा मिळाला असून, राज ठाकरे यांच्या विरोधातील अटक वॉरंट (Arrest Warrant) रद्द करण्यात आला आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी वरील आदेश दिला आहे. तर शिराळा (Shirala Court) न्यायालयातील खटल्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याचे निर्देश राज ठाकरे यांना देण्यात आले आहेत. (Raj Thackeray Arrest Warrant News)

Raj-Thackeray
'राज ठाकरे चटकन कुणाला जवळ करत नाहीत, पण..' भरत जाधवने सांगितली खास बात

राज ठाकरेंना अटक वॉरंट बजावल्यानंतर राज यांच्या वकिलांतर्फे राज ठाकरे हजर राहू शकत नसल्याचे राज यांच्या वकिलांनी न्यायालयीन सुनावणीदरम्यान सांगितले होते. तसेच त्यांच्या गैरहजेरीत अटक वॉरंट रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु, ही मागणी शिराळा फेटाळून लावली होती. त्यानंतर या निकालाविरोधात इस्मामपूर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात (Islampur Session Court) आव्हान देण्यात आले होते. त्यावर सुनावणीदरम्यान, न्यायालयाने अटक वॉरंट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

Raj-Thackeray
'लोड घेऊ नका मी...'; पक्ष सोडण्याच्या चर्चेवर मनसे नेत्याचं स्पष्टीकरण

युक्तीवादात नेमकं काय झालं

दरम्यान, या प्रकरणातील युक्तीवादादरम्यान राज ठाकरे यांचच्या वकिलांनी राज यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे. तसेच राज यांना राज्य सरकारकडून सुरक्षा (Security) दिली जाते त्यामुळे त्यांच्या दौऱ्यावेळी सुरक्षा यंत्रणेवर तसेच प्रशासनावर अतिरिक्त ताण पडतो. त्यामुळे त्यांचा अटक वॉरंट रद्द करण्याची विनंती केली होती. तसेच जामीन मंजूर करावा असे सांगण्यात आले होते. त्यावर निकाल देताना न्यायालयाने राज यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, शिराळा न्यायालयातील खटल्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याचे निर्देश राज ठाकरे यांना देण्यात आले आहेत.

प्रकरण नेमकं काय ?

रेल्वे भरतीमध्ये 2008 मध्ये 'स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या,' या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात कल्याण कोर्टाच्या आदेशाने राज ठाकरेंवर अटकेची कारवाई झाली होती. या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला होता. त्यावेळ जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास दुकानदारांना भाग पाडलं होतं. दरम्यान, विनापरवाना बंद पुकारल्यामुळे शिराळा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वॉरंट हुकूम बजावूनही राज ठाकरे हजर न राहिल्याने न्यायालयाने (Shirala court) राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com