हर्षद मेहतानंतर आता मास्टरमाइंड तेलगी वर वेबसिरीज; 'Scam 2003' चर्चेत

पत्रकार संजय सिंग यांनी लिहिलेल्या 'रिपोर्टर की डायरी' या हिंदी पुस्तकावर आधारित 'Scam 2003' चे कथानक आहे.
Gagan Dev Riar plays Abdul Karim Telgi,scam 2003 webseries
Gagan Dev Riar plays Abdul Karim Telgi,scam 2003 webseriesGoogle

'स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी'(Harshad Mehta) मिळालेल्या यशानंतर आता आणखी एक महाघोटाळा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अप्लॉज एंटरटेन्मेंटने आपल्या बहुचर्चित स्कॅम फ्रॅंचायजीच्या दुसऱ्या सिझनमध्ये 'स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी' ची घोषणा करुन चांगलीच हवा निर्माण केली आहे. 'स्कॅम 1992' मध्ये प्रतिक गांधी ने दलाल स्ट्रीटचा बिग बुल हर्षद मेहताची भूमिका पडद्यावर खूप चांगल्या प्रकारे साकारली होती. आता फळ विक्रेता तेलगीची( Telgi) भूमिका कोणता अभिनेता साकारणार याबाबतही निर्णय झाला आहे. थिएटरमध्ये कामाचा जास्त अनुभव असलेल्या गगन देव रियारची तेलगीच्या मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आल्याचं बोललं जात आहे.(Gagan Dev Riar plays Abdul Karim Telgi,scam 2003 webseries)

Gagan Dev Riar plays Abdul Karim Telgi,scam 2003 webseries
कंगनाच्या 'धाकड' चे शो कॅन्सल, कार्तिकच्या 'भूलभूलैय्या 2' ने केलं गारद

ही वेबसिरीज कर्नाटकच्या खानापूरमध्ये जन्मास आलेला एक फळ विक्रेता अब्दुल करीम तेलगीच्या आयुष्यावर आणि भारतातील मोठ्या घोटाळ्यात मास्टरमाइंड होईपर्यंतच्या त्याच्या प्रवासावर आधारित आहे. कितीतरी राज्यांना या घोटाळ्यानं गिळंकृत केलं होतं,आणि यामुळे अख्खा देश हादरला होता. अब्दुल करीम तेलगी स्टॅम्प पेपर घोटोळ्याचा मास्टरमाइंड होता.

'स्कॅम 2003' कथानकाला पत्रकार संजय सिंग यांनी लिहिलेल्या 'रिपोर्टर की डायरी' या हिंदी पुस्तकातील दाखल्यांचा आधार आहे. पत्रकार संजय सिंग यांनीच या स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. या वेबसिरीजचं दिग्दर्शन राष्ट्रिय पुरस्कार विजेता दिग्दर्शक हंसल मेहता आणि तुषार हिरानंदानी करणार आहेत. ही वेबसिरीज सोनी लिव्ह वर स्ट्रिम केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com