देशी दारुची तस्करी करणाऱ्या रिक्षाने दुचाकीस्वाराला उडवले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

या अपघातात रिक्षातून एक मोठी बॅग खाली पडली त्या बॅगेत मोठ्या प्रमाणात देशी दारुच्या बाटल्या होत्या.

औरंगाबाद : येथील सिडको - जय भवानीनगर रोडवरील कामगार चौकाच्या पुढे शनिचौकात एका अवैद्यरित्या देशीदारुची तस्करी करणाऱ्या रिक्षाने बुधवारी (ता. 13) दुपारी अडीचच्या सुमारास दुचाकीस्वार युसुफ पठाण या इसमास उडविले. यात दुचाकीस्वाराच्या पायाला व हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत. तर या अपघातानंतर रिक्षावाल्याने तेथून जोरात पळ काढला. 

युसुफ पठाण हे आपल्या साईन या गाडीने जात असताना. समोरुन जोरात येणाऱ्या रिक्षाने धडक दिली. या अपघातात रिक्षातून एक मोठी बॅग खाली पडली त्या बॅगेत मोठ्या प्रमाणात देशी दारुच्या बाटल्या होत्या.

या अपघातात दुचाकीस्वार हे खाली पडले त्यांच्या हाताला पायाला गंभीर जखमा झाल्या होत्या. यानंतर रिक्षालाल्याने जोरात तेथून पोबारा केला. काहीवेळातच पोलीसही घटनास्थळी पोहचले होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :