बीड जिल्ह्यात सकाळपासून पाऊस

दत्ता देशमुख
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

बाजारपेठांमध्येही पावसाचा परिणाम जाणवला. 

बीड : शहर व परिसरासह जिल्ह्यातील बहुतांश भागांत मंगळवारी (ता. १०) सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे.  
मागचे काही दिवस उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा जोरदार पुनरागमन केले आहे. सकाळीच पावसाला सुरुवात झाल्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेला जाताना अडचण झाली. तर बाजारपेठांमध्येही पावसाचा परिणाम जाणवला. 

कापसाचे नुकसान
कपाशीची बोंडे फुलून कापूस वेचणीला आला आहे. बहुतेक भागात कापसाची वेचणीही सुरू आहे. पण, मंगळवारी अचानक सुरू झालेल्या पावसामुळे कापसाचे नुकसान झाले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :