लातूर-बार्शी मार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

सरकारने 30 जून 2016 ची कर्जमाफीसाठी असलेली थकबाकीची अट रद्द करुन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्यावी, 10 हजार रुपये या नवीन कर्जाचे शेतकऱ्यांना बँकेने वाटप करावे. येथील निराधारांच्या गेल्या चार महिन्यांपासून रखडलेल्या पगारी व नवीन निराधारांना पगारी चालू व्हाव्या यात, गेल्या चार महिन्यांपासून गावांमध्ये राँकेल पुरवठा बंद आहे.

कसबे तडवळे - शेतकऱ्यांसाठी 30 जून 2016 ची कर्जमाफीसाठी असलेली थकबाकीची अट रद्द करुन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. 10 हजार रुपये हे नवीन कर्ज बँकेने उपलब्ध करुन द्यावे या व इतर काही अन्य मागण्यांसाठी कसबे तडवळे येथे लातूर-बार्शी राज्यमार्गावर आज (मंगळवारी) सकाळी विजयसिंह जमाले यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको अंदोलन करण्यात आले

सरकारने 30 जून 2016 ची कर्जमाफीसाठी असलेली थकबाकीची अट रद्द करुन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्यावी, 10 हजार रुपये या नवीन कर्जाचे शेतकऱ्यांना बँकेने वाटप करावे. येथील निराधारांच्या गेल्या चार महिन्यांपासून रखडलेल्या पगारी व नवीन निराधारांना पगारी चालू व्हाव्या यात, गेल्या चार महिन्यांपासून गावांमध्ये राँकेल पुरवठा बंद आहे. तो चालु करण्यात यावा, शौचालय बांधण्याच्या अटीवरुन काहीजणाचा स्वस्त धान्य दुकानांमधून मिळणारा माल बंद करण्यात आला असून ती अट शिथिल करुन माल मिळावा या मागण्यासाठी येथील माजी उपसरपंच विजयसिंह जमाले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी लातुर-बार्शी राज्य मार्गावर एक तास रास्ता रोको करण्यात आले.

यावेळी विजयसिंह जमाले, शिवाजी गावखरे, बबन सोनटक्के आदीनी भाषणे केली. या अांदोलनासाठी उपस्थित असलेले महसूल मंडळ अधिकारी गोपाळ अकोसकर, संभाजी चौरे, ढोकी पोलिस ठाणेचे सहायक पोलिस निरिक्षक किशोर मानभाव यांनी मागण्याचे निवेदन स्वीकारले. रास्ता रोको करण्यापूर्वी अांदोलनकर्त्यांनी हालगी वाजवत संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहीजे, अशा प्रकारच्या घोषणा देत गावांमधून फेरी काढली. या अांदोलनामध्ये महिलांनी देखील मोठा सहभाग घेतला होता. एक तास चाललेल्या या रास्ता रोकोमुळे लातुर-बार्शी राज्यमार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. रास्ता रोको अंदोलन संपल्यानंतर वाहतुक व्यवस्था सुरुळीत करण्यासाठी पोलिसांना अर्धा तास लागला.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
कट्टर मुस्लिम दहशतवाद संपवून टाकू; मोदी-ट्रम्प यांचे संयुक्त निवेदन
पुणे: चार धरणांत मिळून 0.12 टीएमसीने वाढ​
माण: बोअरवेलमध्ये पडलेल्या मंगेशचा अखेर मृत्यू
सलाहुद्दीनला ठरविले जागतिक दहशतवादी​
सर्जिकल स्ट्राइकवर एकही प्रश्‍न नाही: नरेंद्र मोदी​
मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेपासून रोखणार​
शाहू कार्यात तंत्रज्ञानाधारित रोजगाराची बीजं - डॉ. रघुनाथ माशेलकर​
३१ दिवस, पावणे चारशे तास आणि ४६ हजार पोळ्या​ 

मराठवाडा

पूर्णा (परभणी): तालुक्यातील बरबडी येथील लक्ष्मण गणेश सोलव या बावीस वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पाठपुराव्याला यश औरंगाबाद : दमणगंगेचे पन्नास टीएमसी (50 अब्ज घनफुट) पाणी गोदावरी खोऱ्यात सोडून...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

लोहा : बैलगाडा घेऊन शेतीकामाला जात असताना बैलगाडा उलथून झालेल्या अपघातात शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना हिप्परगा गावालगतच्या...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017