कल्याण डोंबिवलीत विजेचा लपंडाव; तहसीलदार कार्यालयात वीज पुर्ववत

रविंद्र खरात
मंगळवार, 11 जुलै 2017

कार्यालय मधील सोमवार पासून विद्युत पुरवठा खंड़ीत झाला होता. त्यामुळे कामकाजावर किरकोळ परिणाम झाला. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाला कळविण्यात आले, मंगळवारी दुपारी दुरुस्तीचे काम झाल्याने विद्युत पुरवठा सुरळीत झाला आहे, अशी माहिती कल्याण तहसीलदार अमित सानप यांनी सकाळला दिली.

कल्याण : मूसळधार पाऊस नसताना कल्याण आणि डोंबिवली शहरी आणि ग्रामीण भागात मागील चार पाच दिवसापासून विजेचा लपंडाव सुरु आहे, त्यामुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त असताना सरकारी कार्यालय असलेल्या तहसीलदार कार्यालय मधील सोमवारपासून (ता. 10) बत्ती गुल झाल्याने काही काळ कामकाज ठप्प होते. अधिकारी, कर्मचारी आणि दाखले घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे चांगलेच हाल झाले. मात्र, आज (मंगळवार) दुपारी वीज आल्याने कार्यालयामधील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने सुटकेचा श्वास सोडला.

कल्याण डोंबिवली शहरात मूसळधार पाऊस नसताना कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, मोहना, अटाळी, वडवली आणि कल्याण ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरु असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे अनेकांची रात्रीची झोप उडाली आहे. सर्व सामान्य नागरिक त्रस्त असताना त्याचा फटका सरकारी कार्यालयालाही बसला आहे. कल्याण तहसीलदार कार्यालयमध्ये सोमवारपासून विजेचा लपंडाव सुरु होता आणि दुपारी विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने तहसीलदार कार्यालय अंधारात होते. दरम्यान, तहसीलदार कार्यालयात वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाण पत्र, उपन्न प्रमाण पत्र, जातीचे प्रमाण पत्र, तातपुरता रहिवास प्रमाण पत्र, जेष्ठ नागरिक प्रमाण पत्र, शेतकरी असल्याचा दाखला, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आदी कामांसाठी नागरिक, विद्यार्थी वर्ग तहसीलदार कार्यालय कड़े येत असतात. जुलै आठवड्याच्या पहिला दिवसी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, कार्यालय मधील विद्युत पुरवठा खंडित असल्याने अनेकांना खाली हात जावे लागले. यामुळे काही काळ तहसीलदार कार्यालय मधील कामकाज ठप्प होते.

सलग दुसऱ्या दिवशी सकाळीही बत्ती गुल झाल्याने अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला अंधारात काम करावे लागले. सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत विभाग मधील कर्मचारी वर्गाने आज दुपारी येवून दुरुस्तीचे काम केले. तहसीलदार कार्यालय मधील विद्युत पुरवठा पुन्हा सुरु झाल्याने अधिकारी कर्मचारी वर्गाने सुटकेचा श्वास सोडला.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला, 7 ठार
या हल्ल्याचा तीव्रपणे निषेध करावा : नरेंद्र मोदी
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन​

तळेगाव 'MIDC'तील चौथ्या टप्प्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध
मुकेश अंबानींच्या "ऍण्टिलिया'ला आग​