कल्याण पूर्व मधील विद्यार्थ्यांनी शाळेत साजरा केला बैलपोळा...

रविंद्र खरात
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

कल्याण : कल्याण पूर्व मधील सम्राट अशोक विद्यालय मधील विद्यार्थी वर्ग आणि शिक्षकांनी एकत्र येवून आज (सोमवार) सकाळी बैलपोळा साजरा केला.

कल्याण : कल्याण पूर्व मधील सम्राट अशोक विद्यालय मधील विद्यार्थी वर्ग आणि शिक्षकांनी एकत्र येवून आज (सोमवार) सकाळी बैलपोळा साजरा केला.

सोशल मीडिया मध्ये अडकत चाललेल्या विद्यार्थी वर्गाला माझा आवडता सण असा निबंध शहरी भागातील विद्यार्थ्यांना केवळ काल्पनिक लिहावा लागतो. परंतु,  बैलपोळा सण, त्याचे महत्व याबाबत अनेक विद्यार्थी अनभिज्ञ असतात हे ओळखून शाळेने ओळखले होते. गेल्या दोन वर्षांपासून शाळेत शेतकरी दादाला बोलावून प्रत्यक्ष सण साजरा करण्याची कल्पना शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांना सुचली व त्यांनी यंदादेखील तालुक्यातील मुकुंद पावशे व सरिता पावशे या शेतकरी दांपत्याला त्यांच्या बैलजोळीसह बोलावून बैलपोळा साजरा केला.

आज सकाळी शाळेच्या पटांगणात बैलांना सजविण्यात आले व बैलांचे महत्व विद्यार्थ्यांना सांगून हा सण उत्साहात साजरा केला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पी.  टी. धनविजय, सुजाता नलावडे हे उपस्थित होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
राज्यभर संततधार 
मोबाईल, गेम हिरावतोय लहानग्यांची दृष्टी!
बारामतीची साखर अन्‌ राज्यात पाऊस!
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस
खंडाळ्याजवळ हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळली
नकुशी बनली विश्‍वचषक विजेती
मुलीच्या येण्याने कुटुंब परिपूर्ण
केईएमच्या दारी नंदीबैलाची स्वारी