दादर चौपाटीवर सापडलेले मृत पिल्लू व्हेल माशाचे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

दादर चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवणाऱ्या जय श्रुंगारपुरे या स्वंयसेवकाला माशाचे मृत पिल्लू सापडले होते. श्रुंगारपुरे यांनी माशाबाबतची माहिती पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली होती; परंतु पालिका अधिकाऱ्यांनी ही माहिती वनविभागाला न कळवल्याने संताप व्यक्त होत आहे.

मुंबई : दादर चौपाटीवर रविवारी (ता.20) आढळलेले माशाचे मृत पिल्लू हे डॉल्फिन नसून व्हेलचे होते, असे वन विभागाने स्पष्ट केले आहे; तर महापालिकेने या माशाबाबत वनविभागाला कळवले नसल्याने संताप व्यक्त होत असून हा विभाग पालिकेला नोटीस बजावणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

दादर चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवणाऱ्या जय श्रुंगारपुरे या स्वंयसेवकाला माशाचे मृत पिल्लू सापडले होते. श्रुंगारपुरे यांनी माशाबाबतची माहिती पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली होती; परंतु पालिका अधिकाऱ्यांनी ही माहिती वनविभागाला न कळवल्याने संताप व्यक्त होत आहे.

कांदळवन वनविभागाचे उपवन संरक्षक मकरंद घोडके यांनी सांगितले की, मृत माशासंदर्भातील माहिती वन विभागाला रविवारी रात्री मिळाली. त्याचा शोध सोमवारपर्यंत सुरू होता. अखेर दादर वॉर्ड कार्यालयातील पालिका अधिकाऱ्यांनी व्हेल माशाचे मृत पिल्लू प्रभादेवीतील पालिका केंद्रात ठेवल्याचे सांगितले.

दोन वर्षांपूर्वीच वनविभागाने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र लिहिले होते. त्यामध्ये संवर्धित वन्यजीवांची माहिती वनविभागाला देण्यासंदर्भात कळवले होते. संवर्धित प्राण्यांवर वनविभागाचा हक्क आहे, अशी कल्पनाही त्यांनी दिली होती. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांकडून माहिती न मिळणे हे आदेश न पाळण्याचा प्रकार असल्याची टीकाही घोडके यांनी केली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :