शिक्षणमंत्री तावडे, कुलगुरुंचा राजीनामा घ्यावा: आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

ऑनलाईन असेसमेंट प्रक्रियेच्या अपयशाला जबाबदार म्हणून शिक्षणमंत्री विनोद तावडे आणी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली आहे. 

मुंबई - ऑनस्क्रिन असेस्मेंटचा गोंधळ निकाली लावण्याप्रकरणी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज (सोमवार) राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेत शिक्षणमंत्री विनोद तावडे व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरुंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी ऑनस्क्रिन असेस्मेँटचा गोंधळ निकाली लावण्यासाठी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेतली. अजूनही पेपर तपासणीत गोंधळ सुरू असल्याची तक्रार आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली. टेंडर प्रक्रीयेतील गोंधळ, कुलसचिव एम. ए. खान यांची झालेली बदली याबाबत राज्यपालांशी चर्चा करण्यात आली. 

ऑनलाईन असेसमेंट प्रक्रियेच्या अपयशाला जबाबदार म्हणून शिक्षणमंत्री विनोद तावडे आणी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली आहे.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या :