शेअर बाजार तेजीवर स्वार; निफ्टी 10 हजारांजवळ

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जुलै 2017

बीएसईच्या निर्देशांकांमध्ये कंझ्युमर डय़ुरेबल्स निर्देशांक सर्वाधिक वधारला आहे. त्यात 1.1 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यापाठोपाठ एफएमसीजी 0.96 टक्के, आयटी 0.77 टक्के आणि टेक 0.74 टक्क्यांनी वधारले आहेत. 

मुंबई: भारतीय शेअर बाजारात आठवड्याची सुरूवात तेजीने झाली आहे. दोन्ही निर्देशांकांनी उच्चांकी पातळी गाठली आहे.

सध्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 192 अंशांनी वधारला असून 32,221.50 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 50 अंशांची वाढ झाली आहे. निफ्टी 9,965.05 पातळीवर व्यवहार करतो आहे. दोन्ही निर्देशांकांनी इंट्रा.डे व्यवहारात अनुक्रमे 32,232.63 आणि 9,968.95 अंशांची उच्चांकी पातळी गाठली आहे. 

बीएसईच्या निर्देशांकांमध्ये कंझ्युमर डय़ुरेबल्स निर्देशांक सर्वाधिक वधारला आहे. त्यात 1.1 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यापाठोपाठ एफएमसीजी 0.96 टक्के, आयटी 0.77 टक्के आणि टेक 0.74 टक्क्यांनी वधारले आहेत. 

सध्या मुंबई शेअर बाजारात रिलायन्स (+ 2.19 टक्के), आयटीसी (+ 1.91 टक्के), विप्रो (+1.82 टक्के), आयसीआयसीआय बँक (1.29 टक्के) आणि इन्फोसिस (1.13 टक्के) यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले आहेत. तर  ओएनजीसी (-1.34 टक्के), एशियन पेंट्स (-0.83 टक्के), एल अँड टी (-0.42 टक्के) आणि सन फार्माच्या (-0.37 टक्के) शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या :