मुंबई: तुर्भेत दुहेरी हत्याकांड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

तुर्भे येथील पुलाखाली दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले. या दोघांची हत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. तुर्भे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास करत आहेत. 

नवी मुंबई: तुर्भे येथे आज (बुधवार) सकाळी दुहेरी हत्याकांडाची घटना उघडकीस आली. पुलाखाली दोन तरुणांचे मृतदेह सापडले असून, पोलिस शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तुर्भे येथील पुलाखाली दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले. या दोघांची हत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. तुर्भे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास करत आहेत. 

हत्या झालेल्या दोघांची ओळख पटली आहे. संदीप उर्फ बाळा गायकवाड (वय २२) आणि समीर अस्लम शेख (वय २०) अशी मृतांची नावे आहेत. संदीप तुर्भेमधील आनंदनगर तर समीर हनुमाननगर झोपडपट्टीत राहणारे  आहेत. हत्येच कारण अद्याप अस्पष्ट असून, रात्री उशिरा ही हत्या झाली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :