...अरुंद रस्त्यामुळे त्रास होईल, मात्र सेवा द्या- गणपत गायकवाड

कल्याण पूर्व मध्ये केडीएमटी बस सुरू झाल्यावर मान्यवरांनी तिकीट काढून प्रवास केला.
कल्याण पूर्व मध्ये केडीएमटी बस सुरू झाल्यावर मान्यवरांनी तिकीट काढून प्रवास केला.

कल्याण : सर्वसामान्य नागरीकांचा विचार करून कल्याण पूर्व मध्ये आज केडीएमटी बस सुरू झाल्याने समाधान वाटते, यापूर्वी ही बस सुरू झाली मात्र अरुंद रस्त्यामुळे बंद पडली मात्र यावेळी तसे करू नका, आगामी काळात निश्चित रस्ते मोठे होतील त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार गणपत गायकवाड यांनी एका कार्यक्रमात दिली.

कल्याण पूर्वमधील गणपती चौक ते गावदेवी मंदीर चिंचपाडा यामार्गावर भाजपा परिवहन सदस्य सुभाष म्हस्के यांच्या पाठपुराव्यामुळे केडीएमटी बस चा शुभारंभ आज गुरुवार ता 9 नोव्हेंबर 2017 रोजी आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.  यावेळी सभापती संजय पावशे, परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के, प्रभाग समिती सभापती हेमलता पावशे, भाजपा ठाणे पालघर विभाग सचिव  नाना सूर्यवंशी, संजय मोरे ,माजी नगरसेवक अंनता पावशे   रवि हराळे, संदीप तांबे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी  भाजपा महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठया प्रमाणात उपस्थित होत्या.

यावेळी आमदार गणपत गायकवाड आपल्या भाषणात म्हणाले की अनेक शहरात जेव्हा मॉल येऊ लागले तेव्हा छोटे छोटे दुकानदार घाबरले होते मात्र त्या दुकानदारांचे दुकान बंद झाले का असा सवाल करत पुढे म्हणाले की कल्याण पूर्व मध्ये बस सुरू झाल्याने रिक्षा वाल्यांचा धंदा काही कमी होणार नसून रिक्षा चालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी केले. काही वर्षापूर्वी कल्याण पूर्व मध्ये अरुंद रस्त्यामुळे बंद झाल्या मात्र यावेळी थोडा त्रास सहन करा मात्र बस सुरू ठेवण्याचे आवाहन यावेळी आमदार गायकवाड यांनी केले. यावेळी भाजपा ठाणे पालघर विभाग सचिव  नाना सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात कल्याण पूर्व मध्ये बस सुरू झाल्याने अभिनंदन करत म्हणाले की कल्याण पूर्व मधील यु टाइप रस्तारुंदीकरण आणि त्यात बाधित होणाऱ्या नागरिकांचे पुर्नवसन विषय मार्गी लावावी अशी यावेळी मागणी केली. तर सभापती संजय पावशे यांनी सांगितले की 2 किलोमीटरचा प्रवास केवळ आम्ही 5 रुपयात देत असून नागरिकांनी जास्तीत जास्त प्रवास करावा, प्रवास केल्याने आमचे उपन्न वाढेल आणि बस ही सुरू राहील मात्र उपन्न कमी असल्यास बस बंद करावी लागते अशी समस्या सभापती संजय पावशे यांनी यावेळी मांडली.

वाहतूक कोंडी...
अरुंद रस्त्यात बस सुरू झाली, बस गणपती चौकातुन मार्गस्थ होताच, अरुंद रस्त्यामुळे बसच्या मागे रिक्षा आणि वाहनांची भली मोठी रांग लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती, यातून केडीएमटी मार्ग कसे काढणार याकडे लक्ष्य लागले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com