रेल्वे गेट बंद केल्याने कल्याण स्थानकात जाणे त्रासदायक

मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

कल्याण रेल्वे स्थानकात जाणारा न्यू सांगळेवाडी प्रवेशद्वार गेट रेल्वे ने केला बंद. तो गेट त्वरीत सुरू करावा : स्थानिक नगरसेवक प्रकाश पेणकर यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकामधील होम प्लेटफार्म 1 जवळील सांगळेवाडी प्रवेशद्वार गेट रेल्वे प्रशासनाने अचानक बंद केल्याने नागरिकांना रेल्वे स्थानक गाठणे त्रासदायक होत असून, ते गेट त्वरित सुरू करावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

कल्याण पश्चिम मधील वाढती लोकवस्ती आणि वाढते रेल्वे प्रवासी संख्या पाहता वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने 15 वर्षापूर्वी न्यु कल्याण सांगळेवाडी, होम प्लेटफार्म नंबर 1 येथे प्रवासी नागरीकांन साठी प्रवेशद्वार गेट निर्मिती केली होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातुन रिक्षा व इतर वाहनासाठी रस्ते बनविण्यात आले आहेत. शिळरोड, पत्रिपुल, कचौरे, चक्कीनाका, कल्याण पूर्व मधील नागरीक नवीन विकसित झालेला सांगळेवाडी परिसरातील हजारो प्रवाशी नागरीक, चाकरमानी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक ह्या प्रवेशद्वाराचा वापर करतात.

रेल्वे स्थानकातील मुख्य प्रवेशद्वाराचा ताण कमी करण्यासाठी सांगळेवाडी येथील प्रवेशद्वार सोयीस्कर होता, त्यासोबत छोटे तिकीटघर, पिण्याचे पाणी, शौचालय, पार्कींग, रिक्षा स्थानके निर्माण करण्याची मागणी होत असताना अचानक त्या परिसरातील प्रवेशद्वार बंद केल्याने नागरीकांची तारांबळ उडाली आहे. गेटवर पत्रे ठोकल्याने अनेक जण आपला जीव मुठीत घेऊन पत्र्यावरून उड्या मारत जातात तर काही जण वळसा घालून स्टेशन गाठतात त्यामुळे नागरीकांना नाहक त्रास होत असून तो त्वरीत गेट सुरू करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष्य लागले आहे.

पूर्वी तेथे रस्ता होता मात्र तेथून नागरीक रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करू लागल्याने सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाल्याने तो गेट बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी रेल्वे स्थानकातील पादचारी पूल आणि सरकत्या जिन्याचा वापर करावा रेल्वे लाईन ओलांडून प्रवास करू नये, असे आवाहन कल्याण रेल्वे स्टेशन मास्तर प्रदीपकुमार दास यांनी केले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: mumbai news kalyan railway station gate closed