मुंबईः पावसाच्या कोसळण्याने मस्जिद बंदर बाजारपेठ ठप्प

दिनेश चिलप मराठे
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

8 ते 10 कोटींचा व्यापार ठप्प

मुंबईः भाद्रपद अमावस्या संपत आली असून, दक्षिण मुंबईतील हक्काची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेला विभाग नरसी नाथा स्ट्रीट आणि परिसर एरवी गि-हाइकांच्या वर्दळीने गर्दीने भरलेला असतो. येथील किराना माल, सुका मेवा, धान्य बाजार, तेल बाजार, काथिया बाजार, स्टेशनरी मार्केट यांचा दिवस भरातील व्यापार अंदाजे 8 ते 10 कोटींचा असतो तो आज (बुधवार) पूर्णतः ठप्प होता, असे म्हटल्यास काही वावगे ठरू नये, अशी परिस्थिती काल पासून कोसळणाऱ्या पावसामुळे उद्भवली आहे.

अनियमित रेल्वे, प्रवासी आणि लोकांचा पावसात अडकण्याच्या भितीने घेतलेला अवकाश, शाळा कॉलेजला मिळालेली सुट्टी या सर्वांचा परिणाम दक्षिण मुंबईत दिसून येत आहे. जेथे पाऊल ठेवायला जागा नसते तेथील परिस्थिती आज फारच वेगळी आहे. पाऊस कोसळतोय आणि रस्ते रिकामे अशी परिस्थिती आहे. असाच प्रकार भायखला येथील भाजी मॉर्केट, फ्रूट मार्केट, फिश मार्केट येथे आहे. खरेदीदार नसल्याने व्यापारी हातावरहात ठेऊन बसलेले आहेत.

नरसी नाथा स्ट्रीट येथील महालक्ष्मी मेवा मसाला ट्रेडिंग कंपनीचे मालक नरेंद्र विसारिया यांनी सांगितले, मंगळवार (ताय 19) दुपारी 2 नंतर पाऊस सुरु झाला आणि बाजार ठप्प होण्यास सुरुवात झाली. पावसाच्या भितीने आज गि-हाइक नसल्याने  व्यापार फक्त 20% झाला आहे. पावसामुळे फारच मोठा झटका बसला आहे.

लोणचे व्यापारी श्रीकांत रेवडेकर यांनी दोन दिवस फक्त 10% व्यवसाय झाल्याचे सांगितले. पाऊस असाच पडत राहिला तर फारच कठीण होइल, असेही ते म्हणाले. भाजी मार्केट मध्ये काही भाज्यांचे भाव वाढलेत तर कांदा बटाटा 22 रु. किलो झालाय तर भाज्यांना उठाव नाही.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :