तेजस एक्स्प्रेसमधून हेडफोन चोरीला, एलईडी स्क्रीनवर स्क्रॅच

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 मे 2017

मुंबई ते कोकणचा प्रवास जलद आणि सुखकर व्हावा यासाठी तेजस एक्सप्रेसच्या सीएसएमटी ते करमाळी सेवेस सोमवारी हिरवा झेंडा दाखविण्यात आला. भारतातील सर्वात वेगवान एक्सप्रेस असलेल्या या गाडीत अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.

मुंबई - मुंबई ते गोवा दरम्यान धावणाऱ्या सुपरफास्ट 'तेजस एक्‍स्प्रेस'मधील हेडफोन चोरीला गेले असून, प्रवाशांनी एलईडी स्क्रीनवर स्क्रॅच मारल्याचेही निदर्शनास आले आहे. यापूर्वी 22 मे रोजी मुंबईकडे येत असताना गैरसोयींमुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. ही नाराजी सोशल मीडियावरूनही व्यक्‍त करण्यात आली होती.

या आरामदायी गाडीतील प्रवाशांचा प्रवास सुखद होईल, यासाठी कोकण रेल्वेने ही गाडी सुरु केली आहे. मात्र, प्रवाशांनी एलईडी स्क्रीनवर गाणी ऐकण्यासाठी देण्यात आलेले हेडफोन्स चोरून नेले आहेत. मुंबईहून निघाल्यानंतर प्रवाशांनी खाल्लेल्या खाद्यपदार्थांची वेष्टने व कागदाचे ग्लास परतीच्या प्रवासात तसेच पडलेले होते. काही आसनांवर तोंड पुसण्यासाठी वापरलेले टिश्‍यू पेपर तसेच होते. 

मुंबई ते कोकणचा प्रवास जलद आणि सुखकर व्हावा यासाठी तेजस एक्सप्रेसच्या सीएसएमटी ते करमाळी सेवेस सोमवारी हिरवा झेंडा दाखविण्यात आला. भारतातील सर्वात वेगवान एक्सप्रेस असलेल्या या गाडीत अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. विमानात असतात तशाच सुविधा या गाडीत आहेत. त्यापूर्वी मुंबईकडे येत असताना अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याने तेजसच्या खिडकीच्या काचा फुटल्या होत्या.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या ः
पुणे अन् कोल्हापुरमधील अपघातग्रस्त बसचा क्रमांक एकच​
सहारनपूरमध्ये मोबाईल इंटरनेटवर बंदी​
काश्मीरमध्ये निर्णय घेण्यासाठी लष्कराचे हात मोकळे: जेटली
शेतकऱ्यांना फसवणाऱ्या टोळक्यात मीही सामील झालो: राजू शेट्टी

राज्यातील पाच स्थळांना मिळणार जैवविविधता वारसाचा दर्जा
मराठा क्रांती मोर्चा 9 ऑगस्टला मुंबईत धडकणार
समुद्रकिनाऱ्यांवर उद्यापासून बोटिंग बंद
मुंबई : हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत