महालक्ष्मी देवस्थानः जनहित याचिकेत खुलासा करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

मुंबई: कोल्हापूरमधील महालक्ष्मी देवस्थान मंदिरामध्ये गैरप्रकार होत असल्याचा आरोप करणाऱया जनहित याचिकेत खुलासा करण्याचे आदेश गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

देवस्थान विश्वस्तांनी नियमांचे उल्लंघन करून आर्थिक गैरप्रकार केल्याचा आरोप याचिकादारांनी केला आहे. महालक्ष्मीसह अन्य काही देवस्थानांबाबतही याचिकेत आरोप करण्यात आले आहेत. धर्मादाय आयुक्तांसह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. पुढील सुनावणी चार आठवड्यानंतर होणार आहे.