नगरः हंगा नदीला पुर आल्याने रस्ता सुमारे तीन तास बंद

मार्तंडराव बुचूडे
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

सुपे (नगर) पारनेर (जि. नगर) तालुक्यात आज (बुधवार) सर्वत्र पाऊसाने जोरदार हजेरी लावली. सुपे परीसरातही जोरदर पाऊस झाल्याने हंगा नदीला मोठा पूर आला होता. तर वाळवणे येथील पुलावर पाणी आल्याने सुपे ते वाळवणे रस्ता सुमारे तीन तास बंद होता. सुपे येथील आठवडे बाजार असल्याने बाजारकरूंचेही मोठे हाल झाले. घटस्थापणेपुर्वीचा बाजार असल्याने घटस्थापणेसाठी लागणा-या अनेक वस्तू महिलांना बाजारात घेता आल्या नाहीत.

सुपे व भाळवणी या दोनही मोठ्या गावचा आज आठवडे बाजार होता बाजार भरण्या पुर्वीच 11 वाजणेच्या सुमारासच जोरदार पाऊस आला.  बाजार भरण्याच्या वेळीच जोरदार पाऊसाने जोरदार हजेरी लावली परिणामी बाजरकरूंचे मोठे हाल झाले. महिलांना घटस्थपणेसाठी लागणा-या अनेक वस्तू बजारात घेता आल्या नाहीत. महिलांची मोठी नाराजी झाली.

सुपे येथील परीसरातील 10 ते 12 गावासाठी हा एकमेव बाजार आहे. तसेच भाळवणी येथेही मोठा बाजार भरतो त्याही ठिकाणी परीसरातील आठ ते 10 गावातील बाजारकरू येतात. मात्र या दोनही ठिकाणचा बाजारची आज पाऊसामुळे दानादीन झाली. बाजारातील लोकांची तसेच व्यापा-यांची मोठ धावपळ झाली तर अनेक शेक-यांना आपल भाजीपाला स्वतात विकावा लागला तर काहींनी तेथेच टाकून बाजारातून काढता पाय घेतला. हंगे नदीला जारदार पूर आला होता मात्र या नदीवर मोठमोठे पुल असल्याने वाहतुकीस आढथळा आला नाही. मात्र, वाळवणे येथील पुलावर पाणी आल्याने सुमारे तीन तास वाहतुक बंद होती. त्यामुळे शाळेतील मुलांची व बाजारकरूंची मोठी कुचंबना झाली. सुपे येथून वाऴणे, रायतळे, गणेशवाडी, पिंपरी गवळी, रांजणगाव मशीद व अस्तगाव या सहा गावांना जाणा-या लोकांची मोठी अडचण झाली. त्यांना अनेक तास पाऊसात  रस्त्यावर ताटकळत थांबावे लागले.

वाळवणे येथील पुलाची ऊंची वाढवणे गरजेचे आहे. या पुलाचा वापर परीसरातील सहा गावांना करावा लगत आहे. या पुलावर नेहमीच पाणी असते परीणामी शाळकरी मुलांची व जा-ये करणारांची मोठी कुचंबना होता या पुलाची ऊंची वाढविण्यास अनेक दिवसापुर्वीच मंजूरी मिळाली आहे. मात्र, काम अध्याप सुरू झाले नाही.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :