पुणे-बंगळूर महामार्गावर अपघातात एक ठार; चार जखमी

तानाजी पवार
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

वहागाव (ता. कऱ्हाड जि. सातारा) : पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर बेलवडे हवेली (ता. कराड) येथील उड्डाण पुलावर ट्रक आणि दुध कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक जागीच ठार झाला. तर, एका लहान मुलासह चारजण जखमी झाले आहेत. कल्लापा हणमंत बिराजदार (वय, २७ रा. भिलवडी स्टेशन ता. वाळवा जि. सागंली) असे अपघातात ठार झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.

कु. आराध्या संजय गोरे (वय दीड वर्षे), अश्विनी संजय गोरे (वय-26, रा. येळावी, ता. वाळवा, जि. सांगली), सुनीता वसंत शेडगे (वय- 40, रा. दिग्रज), श्रीधर चावदर (वय-25, रा. भिलवडी) असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे असून, त्यांच्यावर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज (बुधवार) सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास बेलवडे हवेली गावच्या हद्दीत महामार्गावर हा अपघात झाला. उड्डाण पुलावर उभा असणाऱ्या ट्रकला (क्र. एम.एच- १२- एचडी- ५२३२) ला पाठीमागून येणाऱ्या दूध वाहतूक करणाऱ्या कंटेनरने (क्र. एम एच- १४- सीपी- ५९३४) जोरदार धडक दिली. धडक इतकी भयानक होती की, दुध कंटेनरचा चालक जागीच ठार झाला. तर अपघातातील जखमींना कंटेनरच्या केबीनमधून बाहेर काढण्यासाठी दोन क्रेनचा वापर करावा लागला. जखमींना उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताची नोंद तळबीड पोलिसांत झाली असून, अधिक तपास सहायक फौजदार उत्तम कदम हे करीत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: satara news accident in pune banglore highway one dead