साताराः वाळू ठेक्याच्या रक्कमेवरुन माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

वहागाव (सातारा) : वाळू ठेक्यातील रक्कम परत न दिल्याने कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वरच्या माजी सरपंचासह अन्य एकावर कराड शहरातील दोघांनी त्यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला.

संशयित आरोपी आरोपी कराड शहरातील आहेत. बुधवारी (ता. 12) रात्री नऊच्या सुमारास वडोली भिकेश्वर हद्दीत हा प्रकार घडला आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्याप पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झालेली नाही. हणमंत उर्फ नामदेव शंकर साळुंखे (रा. वडोली भिकेश्वर) असे जखमी माजी सरपंचाचे नांव आहे.

वर्षापूर्वी वडोलीत साळंखेने वाळूचा ठेका घेतला होता. तो ठेका अवैध होता. त्याचा गुन्हाही पोलिसात दाखल आहे. त्यावेळी त्याच्यासोबत वाळू ठेक्यात त्याचाच भागीदार असलेल्याने हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचा शोध सुरू आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

टॅग्स