राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेखर गोरेंच्या टोळीला मोका

प्रवीण जाधव
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

सातारा : म्हसवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत खंडणी व खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेखर गोरे व म्हसवड पालिकेच्या नगरसेवकासह चौघांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मोका) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शेखर भगवान गोरे (रा. बोराटवाडी, ता. माण), नगरसेवक संग्राम अनिल शेटे (वय 23, रा. म्हसवड), सतीश आनंदा धडांबे (वय 36) व सागर शंकर जाधव (वय 30, दोघे रा. महिमानगड) यांच्यासह अन्य 20 जणांवर हा गुन्हा दाखल झाला आहे.

टोळीच्या माध्यमातून खंडणीसाठी दहशत निर्माण करून आर्थिक फायदा करून घेणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी अशा गुन्हेगारांवर मोका कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

म्हसवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर म्हसवड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक पद्माकर घनवट लक्ष ठेवून होते. त्यातच वरकुटे-मलवडी (ता. माण) येथे खंडणीसाठी गिरीराज रिन्युएबल्स प्रा. लि. या कंपनीच्या जागेत घुसून जेसीबीच्या साह्याने बांधकाम पाडण्याची घटना 25 ऑक्‍टोबर 2017 ला घडली. या प्रकरणी गोरेंसह 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यात काही जणांना अटकही करण्यात आली आहे.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान संशयित लोक खंडणीसाठी दहशत निर्माण करणे, दरोडा टाकून वाहने पळविणे अशा प्रकरचे गुन्हे करून आर्थिक फायदा करून टोळी चालवत असल्याचे समोर आले. या प्रकारांमुळे शेखर गोरे यांच्या टोळीविषयी परिसरात दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे अधीक्षक पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार सहायक निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी शेखर गोरे टोळी विरूद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्याचा प्रस्ताव अधीक्षक पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी तो कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाला त्यांनी मंजुरी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास दहिवडीचे पोलिस उपअधीक्षक यशवंत काळे करणार आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :