कऱहाडमध्ये चोरट्यांनी घर फोडून 35 तोळे दागिने लांबविले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

कऱ्हाड (सातारा): येथील गजबजलेल्या वस्तीतील घर फोडून चोरट्यांनी सुमारे 35 तोळे दागिने लंपास केले. येथील कृष्णा नाक्यावर रविवारी (ता. 16) दुपारी घटना घडली.

कऱ्हाड (सातारा): येथील गजबजलेल्या वस्तीतील घर फोडून चोरट्यांनी सुमारे 35 तोळे दागिने लंपास केले. येथील कृष्णा नाक्यावर रविवारी (ता. 16) दुपारी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, घरातील लोक लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. ती संधी साधून चोरट्यांनी हातसफाई केली. रविवारी सायंकाळी ते कुटूंब घरी परतल्यावर चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने पोलिसात संपर्क साधून त्याची माहिती दिली. सातारा येथील स्थानिक गुन्हे प्रकटीकरण व शहर पोलिसांनी शोध घेतला मात्र फारसा उपयोग झाला नाही. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री श्वानपथकासही बोलावण्यात आले होते. मात्र, त्याचाही फारसा उपयोग झाला नाही.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

टॅग्स