पुणेः तमाशा कलावंताचे कलेवरील प्रेम; गणपतीसमोर हुबेहुब देखावा

सुदाम बिडकर
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

पारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील धामणी गावातील तमाशा कलावंत दिनकर विठ्ठल रोकडे यांनी गणपती समोर तमाशा मंडाळाचा हुबेहुब देखावा सादर करुन दिवसें दिवस लोप पावत चाललेल्या तमाशा कलेवरील आपले प्रेम या देखाव्याच्या माध्यमातुन व्यक्त केले आहे. हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहे.

पारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील धामणी गावातील तमाशा कलावंत दिनकर विठ्ठल रोकडे यांनी गणपती समोर तमाशा मंडाळाचा हुबेहुब देखावा सादर करुन दिवसें दिवस लोप पावत चाललेल्या तमाशा कलेवरील आपले प्रेम या देखाव्याच्या माध्यमातुन व्यक्त केले आहे. हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहे.

येथील दिनकर रोकडे यांनी सुमारे आठ वर्ष गणपत व्ही. माने, दत्ता महाडीक, अंजली नाशिककर, प्रकाश अहीरेकर या तमाशा मंडळामध्ये कलावंत तसेच काही तमाशा मंडळामध्ये व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. त्यामुळे श्री. रोकडे यांना तमाशातील सर्व बारिक सारिक बाबींची माहीती असून तमाशा कलेवर त्यांचे जीवापाड प्रेम आहे. परंतु, अलिकडच्या काही वर्षामध्ये चित्रपट, केबल तसेच आर्केष्ट्रांच्या वाढत्या प्रस्थामध्ये तमाशा कला लोप पावत चालली आहे.

तमाशा मंडळ म्हणजे काय, त्याचे व्यवस्थापन कसे असते. वेगवेगळी पात्र सादर करणारे कलावंत यांची सध्याच्या पीढीला माहिती असावी या करता श्री. रोकडे यांनी त्यांच्या घरातील गणपती समोर तमाशा मंडाळाचा हुबेहुब देखावा सादर केला आहे. यामध्ये तमाशाचे सामान वाहणारी वाहणे, कलाकारांची वाहने, आकर्षक मुख्य प्रवेशव्दार, प्रेक्षकांना बसण्यासाठी मोठा तंबू, भव्य व्यासपीठ, कलाकारांना वेशभुषा करण्यासाठी स्वतंत्र राहुट्या, कलाकारांसाठी जेवण बनविण्यासाठी वेगळी राहुटी, मोठे मोठे लाऊडस्पिकर, डॉल्बी सिस्टीम, लाईट व्यवस्था, प्रवेशव्दारावरील विद्युत रोषणाई, तिकीट विक्रीसाठी बुकींग कार्यालय या सर्व बाबी श्री. रोकडे यांनी स्वःता हुबेहुब बनविल्या आहेत. या देखाव्याबरोबरच तमाशाची गणगवळण, रंगबाजी, वगनाट्य याची ध्वनीफीत सीडीप्लेअरवर लावल्यामुळे आपण खरच तमाशाच्या
राहुटीमध्ये उभे असल्याचा भास होत आहे. हा अनोखा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करु लागले आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
फासावर जाईन, पण भाजपशी समझोता नाही- लालू प्रसाद यादव
पुणे: नारायणगावजवळ एसटीला अपघात; 8 जणांचा मृत्यू
तिसऱ्या सामन्यासह भारताचा मालिका विजय
सिंधूचे सुवर्ण स्वप्नभंग
शिवसेनेच्या नाराजांना मुख्यमंत्र्यांचे 'गाजर'
भाजप म्हणजे खरेदी-विक्री संघ! - अशोक चव्हाण
'कह दू तुम्हें' वापरण्यास बादशाहोला अंतरिम मनाई