आई रागविल्याने अकरा वर्षाच्या मुलाची आत्महत्या

निलेश कांकरिया
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

वाघोली (पुणे): आई रागविल्याने अकरा वर्षाच्या मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघोलीतील विनायक पार्कमध्ये बुधवारी (ता. 8) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

वाघोली (पुणे): आई रागविल्याने अकरा वर्षाच्या मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघोलीतील विनायक पार्कमध्ये बुधवारी (ता. 8) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

सोहम मेाहन धेवडे (वय 11, रा. विनायक पार्क, वाघोली) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसानी दिलेल्या माहीतीनुसार, धेवडे कुटुंबिय आपल्या दोन मुलांसमवेत वाघोलीतील विनायक पार्क मध्ये राहतात. त्यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. सोहमला त्याची आई रागविली हेाती. हा राग मनात धरुन घरात एकटा असताना त्याने खिडकीला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्याची आई घरी आली. तिने खूप वेळ दरवाजा वाजविला. मात्र, सोहम याने दरवाजा न उघडल्याने शेजार्यांनी ढकलून दरवाजा उघडला. यावेळी त्याने आत्महत्या केल्याचे समजले. त्याला त्वरीत रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्याचा आधीच मृत्यु झाला होता.
त्याच्यावर त्याच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोहम हा विष्णुजी शेकुजी सातव विद्यालयात पाचवी इयत्तेत शिकत हेाता. त्याची शाळेतील हजेरी चांगली हेाती. आठ तारखेपासून परीक्षा सुरु झाली हेाती. आठ तारखेचा पेपरही त्याने दिला. धेवडे कुटुंबिय मुळचे जामखेड (ता. नगर) येथील आहे. मात्र, गेल्या आठ वर्षांपासून ते वाघोलीत राहत होते. त्याच्या मृत्युची बातमी कळताच शाळेतही हळहळ व्यक्त करण्यात आली.

Web Title: pune news 11-year-old son commits suicide in wagholi