लोणावळ्यातील दुहेरी खून चोरीच्या उद्देशाने; दोघांना अटक

भाऊ म्हाळस्कर
रविवार, 11 जून 2017

लोणावळ्यातील आयएनएस शिवाजी केंद्राजवळ सिंहगड महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या सार्थक वाकचौरे व श्रुती डुंबरे यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता.

लोणावळा - लोणावळा शहरासह संपूर्ण महाराष्ट्र हालवून सोडलेल्या लोणावळा शहरातील महाविद्यालयीन युवक युवतीच्या दुहेरी खून प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचे समोर आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या दुहेरी खूनाचा छडा लावण्यात अखेर सव्वादोन महिन्यांनी पोलिसांना यश आले. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी दोघांना आज (रविवार) ताब्यात घेतले आहे. असिफ शेख व सलिम शेख उर्फ सँन्डी (दोघेही रा. लोणावळा) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. आरोपी हे नशेखोर असून किरकोळ पैशासाठी हा खून झाल्याचे समजते

लोणावळ्यातील आयएनएस शिवाजी केंद्राजवळ सिंहगड महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या सार्थक वाकचौरे व श्रुती डुंबरे यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. ताब्यात घेण्यात आलेले आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पुढे येत आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -
स्वामिनाथन आयोगाच्या प्रमुख शिफारशी

अंबाबाईच्या घागरा-चोली रुपातील पुजेमुळे शिवसेनेचे आंदोलन​
बीड: धानोराजवळ खासगी बसला अपघात; 12 ठार
गेवराई: बोअरवेलची गाडी पलटी होऊन दोन जण चिरडले

राजू शेट्टींवर सोडलेले सदाभाऊ अस्त्र मुख्यमंत्र्यांवर बुमरॅंग झाले !​
इंग्लंडच्या विजयाने बांगलादेश उपांत्य फेरीत; ऑस्ट्रेलियाचे पॅकअप​
आले ट्रम्प यांच्या मना...
शेतकरी आंदोलनाचं आक्रीत (आदिनाथ चव्हाण)​
यादव म्हणजेच मराठे? (सदानंद मोरे)​

#स्पर्धापरीक्षा - नोटाबंदी