'ताई मला तुमचा अभिमान वाटतो, तुम्हाला मी नेहमी टीव्हीवर पाहते'

मिलिंद संगई
मंगळवार, 11 जुलै 2017

बारामती (पुणे): ...ताई मी तुम्हाला नेहमी टीव्हीवर पाहते आणि मला तुमचा नेहमीच खूप अभिमान वाटतो... कर्ण व वाचा नसलेल्या एका मुलीने आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या जवळ येऊन हे खूणेनेच त्यांना सांगितल्यावर सुळे यांनाही गहिवरुन आले. त्यांच्याच पुढाकारातून आज (मंगळवार) बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींची नाव नोंदणी व त्यांच्या मोजमापांचे काम झाले. या प्रसंगी सुप्रिया सुळे यांनी सर्वच दिव्यांगाशी अनौपचारिक संवाद साधला. या संवादादरम्यान या मुलीने खाणाखूणा करुन ताईंविषयीची आपली भावना व्यक्त केल्यानंतर नकळत ताईंचेही डोळे पाणावले.

सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात अनेक दिव्यांगांनी आज अत्यंत आपुलकीने सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधत त्यांनी सुरु केलेल्या या कामाची प्रशंसा केली. शासनाच्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत नेण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. अनेक महिलांनी मोठ्या प्रेमाने त्यांचा हात हातात घेत त्यांना आशिर्वाद दिले.

वाचा नसलेल्या व कर्णबधीरत्व असलेल्या या मुलीजवळ सुळे जाताच तिने खुणेनेच आनंद झाल्याचे सांगितले. तुम्हाला टीव्हीवर पाहून अभिमान वाटतो, असे नमूद करताच सुप्रिया सुळे यांनी तिला प्रेमाने जवळ घेतले, तिने खूष होऊन ताईंना एक टाळीही दिली. तिच्यासोबत सुळे यांनी एक सेल्फीही घेतला. या शिबीरासाठी आलेल्या अनेक लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शंभर टक्के मदतीची ग्वाही त्यांनी या वेळी दिली.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला, 7 ठार
या हल्ल्याचा तीव्रपणे निषेध करावा : नरेंद्र मोदी
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन​

तळेगाव 'MIDC'तील चौथ्या टप्प्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध
मुकेश अंबानींच्या "ऍण्टिलिया'ला आग​

पुणे

तळेगाव स्टेशन : तळेगाव-चाकण रस्त्यावरील ऐश्वर्या हॉटेलमागील गोडाऊन परिसरात सोमवारी (दि. १८) रात्री भक्ष्य खाताना बिबट्या सदृश्य...

05.12 PM

खडकवासला : नांदेड फाटा येथील सिंहगड स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉ. संतोष आवारी यांच्यावर ७५ वर्षीय रुग्णाकडून चाकूने हल्ला...

02.00 PM

पुणे - दसरा आणि दिवाळीचा मुहूर्त साधून केंद्र, राज्य सरकार सामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत लोटत असल्याचे सांगत, महागाईचा निषेध...

04.27 AM