पिंपरीत निळू फुले नाट्यगृहाचे नाट्यमय उद्घाटन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

मागील पंधरा वर्षापासून राष्ट्रवादीची या शहरावर सत्ता होती, त्यामुळे आमच्याच विकास कामांचे श्रेय आयते भारतीय जनता पक्ष लाटू पाहत असल्याने श्रेयवादाच्या लढाईतून राष्ट्रवादीने हे उद्घाटन उरकले. कालपासूनच राष्ट्रवादीच्या वतीने या नाट्यगृहाचे उद्घाटन करण्यात येणार याची कुणकुण लागल्याने येथे सकाळपासूनच पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

नवी सांगवी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपळे गुरव येथे नव्याने बांधण्यात आलेल्या नटसम्राट निळूभाऊ फुले नाट्यगृहाचे आज (शनिवार) राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने नाट्यमयरित्या उद्घाटन करण्यात आले.

मागील पंधरा वर्षापासून राष्ट्रवादीची या शहरावर सत्ता होती, त्यामुळे आमच्याच विकास कामांचे श्रेय आयते भारतीय जनता पक्ष लाटू पाहत असल्याने श्रेयवादाच्या लढाईतून राष्ट्रवादीने हे उद्घाटन उरकले. कालपासूनच राष्ट्रवादीच्या वतीने या नाट्यगृहाचे उद्घाटन करण्यात येणार याची कुणकुण लागल्याने येथे सकाळपासूनच पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

त्याप्रमाणे सकाळी दहावाजल्यापासून नाट्यगृहासमोर कार्यकर्ते जमायला लागले. नगरसेवक नाना काटे, मयुर कलाटे, भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी शहाध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, स्थायी समिती माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, शिवाजी पाडुळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्याचवेळी पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना नाट्यगृहात प्रवेश करण्यात बंदी असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्वांनी नाट्यगृहाच्या समोरच रिबण कापून व नारळ फोडूला असता पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. त्याचवेळी कार्यकर्त्यांनी अजित पवार झिंदाबाद, राष्ट्रवादी कॉग्रेस झिंदाबादच्या घोषणा दिल्या.

दरम्यान नाट्यगृहात ध्वनी यंत्रणा, अग्निशमण, उपहारगृह, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमनुका न झाल्याचे पत्र माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यातच मुख्यमंत्र्यांना हे उद्घाटन ऑनलाईन करायचे होते तर ते मुंबई अथवा नागपुर मधुनही ते करू शकत असताना, पिंपरी चिंचवड शहरात येवूनही ते या मोठ्या वास्तुकडे फिरकले नाही याबद्दल प्रशांत शितोळे यांनी खेद व्यक्त केला.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :