फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना 'प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान' जाहीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

वसंत व्याख्यानमालेचा होणार विशेष सन्मान

पुणे: प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा 'प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान' या वर्षी ज्येष्ठ विचारवंत  फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. १४ जुलै रोजी (शुक्रवार) सायं. ६.०० वा. एस. एम. जोशी फौंडेशन सभागृह येथे होणाऱ्या समारंभात डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या पुरस्काराचे हे सहावे वर्ष असून यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार, आरोग्यजागर करणारे ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. ह. वि. सरदेसाई यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

संस्थेतर्फे प्रतिवर्षी श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थेचा सन्मान केला जातो. श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी गेली १४३ वर्षे कार्यरत राहिलेल्या पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेचा यावर्षी विशेष  सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

पुणे

पुणे -  ""सोपं असेल तर ते आयुष्य कसलं...? अडचणी, आव्हानं ही तर हवीतच ! गुळगुळीत रस्ते फार उपयोगाचे नाहीत. रस्त्यात...

05.03 AM

पुणे - राष्ट्रीय महामार्गाचे पुणे विभागातील प्रलंबित प्रकल्प, सुरू असलेले प्रकल्प आणि पुढील काळात येऊ घातलेले प्रकल्प मार्गी...

03.03 AM

पिंपरी  - लोकसभा निवडणुकीला सव्वावर्षांपेक्षा जास्त कालावधी असताना केवळ आपली धास्ती घेतल्यामुळे लक्ष्मण जगताप उसने...

02.42 AM