अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

Harassment
Harassmentesakal

चाळीसगाव (जि. जळगाव) : तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातून ती गर्भवती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळविले. तब्बल साडेसहा महिने शारीरिक संबंध ठेवत अत्याचार केला. यातून ती मुलगी गर्भवती झाल्याचा गंभीर प्रकार शनिवारी (ता. २१) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीला आला आहे.

Harassment
लैंगिक सुखाच्या मागणीचा छळ झाला असह्य; पोलिसांत गुन्हा दाखल

भगवान उर्फ (भगा) कैलास सोनवणे (रा. चांभार्डी बुद्रुक -मजरे, ता. चाळीसगाव) असे संशयिताचे नाव आहे. दरम्यान, पीडित मुलीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत.

Harassment
80 वर्षीय चित्रकाराचा अल्पवयीन मुलीवर 'डिजिटल रेप'; Digital Rape म्हणजे काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com