कर्जमाफीसाठी मुंबई महापालिकेचे 60 हजार कोटी द्यावेः अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

जळगावमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा

जळगाव: राज्यातील शेतकरीला कर्जमाफी मिळावी यासाठी मागणी होत आहे. पण या कर्जमाफीसाठी शिवसेनेने आपल्या सत्तेत असलेल्या मुंबई महापालिकेचे 60 हजार कोटी रूपये राज्याला द्यावेत; असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी आज (गुरुवार) लगावला.

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीतर्फे मुकमोर्चा काढण्यात आला. यनिमित्ताने जळगावात आले असता राष्ट्रवादी कांग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, राज्यात कर्जमाफीसाठी 35 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. तर मुंबई महापालिकेकडे 60 हजार कोटी आहेत. उद्धव ठाकरे यांनी उगाच कर्जमाफीचा ढोल वाजवत न बसता, मुंबई महापालिकेचे 60 हजार कोटी राज्यात कर्जमाफीसाठी द्यावे. शिवसेना आणि भाजपने सोबत बसून निर्णय घ्यावा असे आवाहन देखील त्यानी केले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: