जळगावच्या उपमहापौरपदी गणेश सोनवणे बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

जळगाव: जळगाव महापालिकेच्या उपमहापौरपदी सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील खादेश विकास आघाडीचे नगरसेवक गणेश सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांना विरोधी भाजपनेही पाठींबा दिला.

जळगाव: जळगाव महापालिकेच्या उपमहापौरपदी सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील खादेश विकास आघाडीचे नगरसेवक गणेश सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांना विरोधी भाजपनेही पाठींबा दिला.

जळगाव महापालिकेवर शिवसेनेचे माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली खानदेश विकास आघाडीची सत्ता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचा पाठींबा आहे. नुकतीच महपौर निवडणूक बिनविरोध झाली यात मनसेचे ललीत कोल्हे महापौर झाले. त्यांना खानदेश विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि विरोधी असलेल्या भारतीय जनता पक्षानेही पाठींबा दिला होता. आज उपमहामहापौर निवडणूक होती. त्यासाठी खानदेश विकास आघाडीचे गणेश सोनवणे यांचा एकमेव अर्ज आला होता. महापलिकेत विरोधी पक्ष असलेल्या भाजपनेही त्याला पाठींबा दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.

गणेश सोनवणे हे गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडून आले होते. महापालिकेत विरोधी पक्षनेते होते. मात्र या पंचवार्षिक निवडणूकीत त्यानी खानदेश विकास आघाडीत प्रवेश केला. आघाडीतर्फे त्यांना उपमहापौरपदाची संधी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त किशोरराजे निबांळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत सोनवणे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी महापौर ललीत कोल्हे, खानदेश विकास आघाडीचे सभागृह नेते रमेश जैन उपस्थित होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :