बसला CNG ची प्रतिक्षा

Citylinc
Citylincesakal

नाशिक : महापालिका परिवहन सेवेच्या (सिटीलिंक) शहर बससेवेच्या साधारण ४२ बसला अजूनही पुरेसा सीएनजी उपलब्ध नसल्याने अनेक बस केवळ डेपोतच उभ्या राहत आहे. दरम्यान, आता बसवर जाहिरातीद्वारे महसूल वाढीसाठी महापालिका यंत्रणा धोरण ठरवीत आहे.

महापालिकेच्या सिटी लिंकच्या ताफ्यात २०० पैकी ४२ सीएनजी बस आहे. सीएनजीच्या तुटवड्यामुळे नागरिकांना परिवहन सेवा देऊ शकत नाही. बससाठी पुरेशा प्रमाणात केव्हा सीएनजी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. एका बाजूला परिवहन सेवेचा तोटा कमी करून ती नफ्यात आणण्यासाठी सिटीलिंकची यंत्रणा प्रयत्न करीत असताना सीएनजीचा तुटवड्यामुळे बस सेवेपुढे अडचणी आहेत.

Citylinc
सिटी लिंकतर्फे आजपासून महिलांसाठी स्वतंत्र बससेवा | Nashik

अशा स्थितीत कमी उत्पन्नाच्या मार्गावर धावणाऱ्या बस बंद करण्यासारखे उपाय करीत तोटा कमी करण्याचे प्रयत्नांचा विचार करावा लागतो आहे. शहरात सद्यःस्थितीत सीएनजी व डिझेलवर चालणाऱ्या २०५ बस रस्त्यावर धावत आहेत. मनपा सिटीलिंक बस सेवेत प्रारंभीच ठेकेदाराने नव्या २०० सीएनजी व ५० डिझेल बस सुरू करण्याचा निर्णय घेतला.

या बससेवेचे ८ जुलै २०२१ ला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बससेवेचा शुभारंभ झाला. महापालिकेने सिटीलिंक बसवर जाहिरातींना परवानगी देऊन त्यातून महसूल वाढीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्‍मार्ट सिटी प्रतिनिधीसह लेखापाल, उपायुक्त, सिटीलिंक परिवहन सेवेचे व्यवस्थापक अशाची समिती नेमली आहे. ही समिती बसवरील जाहिरातींचे धोरण ठरविणार आहे. पहिल्या टप्प्यात ५० बस शहरातील रस्त्यावर धावत होत्या, लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर बसच्या संख्येत वाढ झाली. जाहिरातीतून येणारे उत्पन्न वाढीसाठी शासनाने दिलेल्या जाहिरात धोरणाचा वापर करण्यात येणार असून, महापालिकेच्या बसवर येत्या काळामध्ये जाहिरात दिसून येणार आहे.

Citylinc
सिन्नर, पिंपळगाव (बसवंत) मार्गावर CITILINC जलद बससेवा; असे आहे वेळापत्रक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com