नाशिक : संत निवृत्तीनाथ पालखीचे पहिले गोल रिंगण उत्साहात

Ringan
Ringanesakal

तुझा पाहूणी सोहळा, माझा रंगला अभंग

गेला शिणवटा सारा, मेघ झाले पांडुरंग....

नाम तुकोबाचे घेता, डोले पताका डौलात... अश्व धावता रिंगणी, नाचे विठू काळजात...

या उक्तीप्रमाणे आज सिन्नर तालुक्यातील दातली येथे झालेल्या गोल रिंगण सोहळ्यात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी (Sant Nivruttinath Palkhi) सोबतचे वारकरी (Warkari) धन्य झाले. टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठलाचे अभंग गात पंढरीच्या दिशेने चालणाऱ्या पावलांनी या रिंगण सोहळ्यातून अनोख्या चैतन्याची ऊर्जा घेतली. (Sant Nivruttinath Palkhi Ashadhi Wari Nashik News)

संत निवृत्तिनाथांच्या पालखीचे पंढरपूरच्या वाटेवरील पहिले गोल रिंगण दातली खंबाळे रस्त्यालगत पार पडले. सकाळी लोणारवाडी येथे मुक्कामाला आल्यावर सिन्नरकरांचे आदरातिथ्य स्वीकारत हजारो वारकरी कुंदेवाडी येथे दुपारच्या जेवणासाठी थांबले तेथून खंबाळे येथील मुक्कामात कडे जात असताना गोल रिंगण सोहळा पार पडला पालखी मार्गावर गेल्या पाच-सहा वर्षांपासून सदर रिंगण सोहळा आयोजित करण्यात येतो गेले दोन वर्ष पूर्ण मुळे वारी झाली नाही त्यामुळे आजचा रिंगण सोहळ्याला वारकऱ्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारला होता तर हा क्षण डोळ्यात टिपण्यासाठी दातली च्या दिशेने येणारे रस्ते माणसांच्या गर्दीने भरून वाहत होते.

सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास रिंगण आला सुरुवात झाली पालखी सोबत असलेल्या दिंडीतील विणेकरी, टाळकरी, पखवाज वादक, झेंडेकरी व डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला स्वतंत्र गटाने गोलाकार उभ्या राहिल्या. पालखी व दिंडय़ा रिंगणात दाखल झाल्यावर मृदंग व टाळांच्या गजरात हजारोंच्या मुखातून ‘ज्ञानोबा-तुकाराम’ चा नामघोष करीत ठेका धरण्यात आला. झेंडेकरी, विणेकरी, टाळकरी, मृदंग वादक, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला या क्रमाने सर्वजण रिंगणातून धावले. शेवटी नाथांच्या पालखीसोबत असलेला मानाच्या अश्वाने प्रदक्षिणा पूर्ण केली.

Ringan
Ashadhi Wari : पाहुयात रिंगण सोहळ्याची क्षणचित्रे!

रिंगण संपल्यावर रिंगणाच्या परिघातच हमामा, फुगडी, हुतूतू, आट्यापाट्या, एकीबेकी हे खेळ टाळ-मृदुंगाच्या गजरात सुरू होते. रिंगणात मनसोक्त नाचणारे वारकरी आपला थकवा विसरून पुढच्या प्रवासासाठी नवी ऊर्जा घेऊन पुढच्या प्रवासाला निघाले.

Ringan
SSC Result : योगायोग की चमत्कार? जुळ्या बहिणींना मार्क देखील सेम टू सेम

पंडित महाराज कोल्हे, संजय महाराज धोंडगे, जयंत महाराज गोसावी, डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, तुळशीराम महाराज गुट्टे, बाळकृष्ण महाराज डावरे, ऍड. गंभीरे, शिवा महाराज आडके यांच्या मार्गदर्शनाखाली दातली ग्रामस्थांच्या सहकार्याने गोल रिंगण पार पडले. यावेळी झालेल्या हजारोंच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निफाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर एमायडिसी व वावी पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com