
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला-कुडाळ मार्गावर निसर्गाच्या कुशीत वसलेले वेतोरे हे सुमारे १९२५ लोकवस्तीचे गाव आहे. गावातून अनामिका नदी वाहते. आंबा, काजू, भात, नाचणी ही गावची प्रमुख पिके आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला) येथील शेतकऱ्यांनी आंबा, काजू या मुख्य पिकांना भाजीपाला आणि कणगर पिकांची जोड दिली. दुग्ध व्यवसायातून आर्थिक क्षमता मिळवली. अभ्यास व पीक नियोजनातून दर्जेदार मालाला स्थानिक व गोव्याची मोठी बाजारपेठ मिळवली. शेतीतून गावाची वार्षिक उलाढाल २५ कोटींहून अधिक वाढली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला-कुडाळ मार्गावर निसर्गाच्या कुशीत वसलेले वेतोरे हे सुमारे १९२५ लोकवस्तीचे गाव आहे. गावातून अनामिका नदी वाहते. आंबा, काजू, भात, नाचणी ही गावची प्रमुख पिके आहेत. फळबाग लागवडीखाली प्रत्येकाकडे सरासरी एक ते दोन एकर तर भातशेतीखाली १० गुंठ्यांपासून अर्धा एकरपर्यंत जमिनी आहेत. अल्पभूधारक असल्याने शेतकऱ्यांनी आजूबाजूच्या गावातील जमिनी भाडेकरारावर घेत विविध प्रयोग राबवण्यास सुरवात केली.
केवळ पावसाच्या पाण्यावर फुलवलेली दर्जेदार शेती
पीक पद्धतीचे सुयोग्य नियोजन
भौगोलिक रचना, जमिनीचा पोत, पाण्याची उपलब्धता, आंबा,काजूचा हंगाम, परिसरातील बाजारपेठांचा केला अभ्यास.
जिल्हयात अन्य जिल्ह्यातूनही भाजीपाला येतो. त्यामुळे उत्तम दर्जाचा भाजीपाला गावातच पिकविला तर त्यास उठाव मिळेल असा विचार.
सुरवातीला ३० ते ४० शेतकऱ्यांकडून खरिपात भाजीपाला लागवड. उदा. दोडका, पडवळ, काकडी, चिबुड, मिरची
कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली आदी जिल्ह्यांत चांगली विक्री होऊ लागली.
एकमेकांच्या अनुकरणातून तरुण शेतकरीही भाजीपाला लागवडीकडे वळले.
जिल्हयात मोठी मागणी असल्याचा आला अंदाज.
जमिनीची कमतरता असल्याने बाजूच्या तेंडोली, गोवेरी गावांतील दीडशे ते दोनशे एकर जमीन वेतोरेतील तरुण शेतकऱ्यांनी कराराने घेतली.
क्षेत्र वाढले तसे उत्पादनही. त्यामुळे सावंतवाडी, बांदा, गोवा आदी बाजारपेठेत भाजीपाला नेण्यास सुरवात. थेट विक्रीतूनही फायदा मिळू लागला.
उत्पादन वाढल्याने एकमेकांत स्पर्धा निर्माण होऊ नये यासाठी वेगवेगळ्या बाजारपेठा निवडण्याचा अलिखित नियम तयार केला. पर्यायाने दरही चांगले मिळू लागले.
आर्थिक समृद्धी प्राप्त झाली.
सातारा जिल्ह्यातील पोतेकरांची देशी केळी वर्षभर खातेय भाव
बाजारकेंद्रित पीक बदल
वर्षभरात कमीत कमी तीन पिके घेता येतील असे नियोजन. खरिपात भातशेती, कणगर ,सुरण, भाजीपाला. मार्चपासून आंबा, काजूचा हंगाम
बाजारपेठेत माल कधी नेल्यास चांगला नफा मिळतो याचा अभ्यास केला. हंगामात सर्वप्रथम भाजीपाला बाजारपेठेत आणल्यास चांगला दर मिळतो हे लक्षात आले.
यावर्षी पितृपक्ष पंधरवड्यात पालेभाजीच्या प्रति पेंडीला १५ रुपये ठोक दर. गेल्या काही वर्षांतील हा सर्वाधिक दर होता. पालेभाजी महिनाभरात तयार होते. एकरी ८ ते १० हजार पेंड्या मिळतात. सरासरी १० रुपये दराने विक्री होते. त्यातून महिन्याला ताजे व उत्पन्न निव्वळ वेळेच्या नियोजनामुळे हाती येते.
शेती व्यवस्थापनामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर
कणगर लागवड
कणगर या कंदपिकालाही मोठी मागणी गोव्यात असल्याचे व रासायनिक निविष्ठांचा वापर कमी होत असल्याने उत्पादन खर्च कमी येतो हे लक्षात आले. व्यापारी गावात येऊन चांगला दर देऊन खरेदी करणार असल्याने विक्रीची चिंता कमी झाली. गावात २० हेक्टर क्षेत्र कणगर पिकाखाली आहे. प्रत्येक शेतकरी एक गुंठ्यांपासून २० गुंठ्यापर्यत लागवड करतो. किलोला ६० ते ७० रुपये सरासरी दर मिळतो. पाच ते सहा महिना कालावधीत हे पीक प्रति गुंठ्यात सुमारे वीस हजार रुपये उत्पन्न देते. दीडशेहून अधिक शेतकरी या पिकात गुंतले आहेत. त्यातील काही सुरण या कंदाचीही लागवड करतात. गोव्यात दोन्ही कंदाना मोठी मागणी आहे.
दहा गुंठ्यांत मिश्रपिके
दहा गुंठ्यांत मिश्रपिकांची संकल्पना. दुग्ध व्यवसायासाठी प्रत्येकी दोन गुंठ्यात मका व नाचणी, प्रत्येकी एक गुंठ्यात चवळी, कुळीथ, भुईमूग, वाल, मिरची.
स्थानिक वाण असलेल्या डोंगरी मिरचीचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन. अन्य मिरचीच्या तुलनेत त्यास चांगली मागणी. शंभर ते १५० रुपये प्रति किलो दराने विक्री.
वेतोरेच्या चिबुडाला, लाल पांढऱ्या भेंडीलाही जिल्हयात मोठी मागणी.
आर्थिक सहकार्य
जिल्हा बँक, वेतोरे सहकारी सोसायटीच्या माध्यमातून किराणा, धान्य, खते, कर्ज, कृषी सेवा केंद्र, दैनंदिन ठेव, दूध, मेडिकल सुविधा.
तलाठी कार्यालय, मंडल अधिकारी कार्यालय, आरोग्य व पशुसंवर्धन केंद्र या सुविधा एका छताखाली.
केवळ पावसाच्या पाण्यावर फुलवलेली दर्जेदार शेती
गावातील सन्मान
शिवराम गोगटे, शेतीनिष्ठ व कृषी भूषण पुरस्कार
एम.के.गावडे- कृषिभूषण
संतोष गाडगीळ- शेतीनिष्ठ, उद्यानपंडित, कृषिभूषण, सहकार कृषी मित्र.
सुशांत नाईक- शेतीनिष्ठ
वेतोरेची वार्षिक उलाढाल
भाजीपाला- दीडशे ते दोनशे एकरांत दोन टप्प्यात लागवड. ७ कोटी रु.
कणगर- २० हेक्टर- ४ कोटी रुपये
आंबा, काजू लागवड ६२५ हेक्टर, १५ कोटी रू.
दुग्ध व्यवसाय- सुमारे १५० शेतकरी. दररोज २०० लिटर दूध संकलन वेतोरे दूध संस्थेकडे. २७ लाख रू. उलाढाल.
पाच एकरांत आंबा, काजू, भातशेती, भाजीपाला शेती आहे. आंतरपीक आणि मिश्रपीक पध्दतीच्या शेतीतून वर्षाला पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न मिळवतो. वयाच्या अठराव्या वर्षापासून शेतीत आहे. त्यातील उत्पन्नातून २० ते २५ लाखांचे घर बांधले. आधुनिक अवजारांची खरेदी केली.
सुशांत नाईक ९४०५१८४४७८,
निसर्ग आणि शेतीचा ताळमेळ जुळवून काजू, आंबा, नारळ, सुपारी, मिरी घेतो. सुमारे १० लाख रुपये वार्षिक उलाढाल होते. शेतीतील पैसा शेतीतच गुंतविण्यावर भर आहे. पाण्याचा एक थेंबही वाया जाणार नाही असे नियोजन केले आहे.
संतोष गाडगीळ ९४०५४९७०५८
गावात पिकविलेल्या भाजीपाल्याला स्थानिकच मोठी मागणी आहे. शेतकऱ्यांना गावातच आठवडा बाजार व थेट विक्री स्टॉल सुविधा उपलब्ध केली आहे.
राधिका रामदास गावडे, सरपंच, वेतोरे
जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ दिला आहे. ग्रासकटर, ताडपत्री, फवारणीपंप, ऑईल इंजिन, पाइपलाइन, पशुसंवर्धन आदींचा त्यात समावेश आहे.
समिधा नाईक, अध्यक्षा, जिल्हा परिषद अध्यक्षा, सिंधुदुर्ग
शहरापेक्षा शेतीत समृद्धी
कोकणातील बहुसंख्य तरुण नोकरीनिमित्त मुंबई, पुणे, गोवा, कोल्हापूरसह विविध शहरांकडे धावत असतो. परंतु वेतोरेतील तरुण त्यास अपवाद आहेत. त्यांनी शेतीतून आर्थिक समृद्ध होता येते हे सिद्ध केले आहे.