esakal | घोडेगावात विहिरीत पडून युवक ठार! 200 ग्रामस्थांचे ठिय्या अंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

घोडेगावात विहिरीत पडून युवक ठार! 200 ग्रामस्थांचे ठिय्या अंदोलन

चार जणावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मृतदेह ताब्यात घेवून अंत्यसंस्कार करण्यात आला.

घोडेगावात विहिरीत पडून युवक ठार! 200 ग्रामस्थांचे ठिय्या अंदोलन

sakal_logo
By
विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : घोडेगाव (ता.नेवासे) येथील युवकाचे विहिरीत पडून मृत्यू (Died) झाला. याप्रकरणी विहीर मालकावर गुन्हा दाखल करावा, यासाठी नाथपंथी डवरी समाजातील दोनशे जणांनी सोनई पोलिस ठाण्यावर मोर्चा आणून ठिय्या अंदोलन केले. चार जणावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मृतदेह ताब्यात घेवून अंत्यसंस्कार करण्यात आला. (a young man has died after falling into a well in ghodegaon)

हेही वाचा: प्रवरा नदीपात्रात झोपून पर्यावरणप्रेमींचे वाळू उपशाविरोधात आंदोलन

घोडेगाव शिवारात अशोक नहार यांचे शेत असून विहिरीतील विद्युत पंप बाहेर काढण्यासाठी शिवाजी एकनाथ सावंत (वय-२६) उतरले असता पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे व पथकाने भेट देवून पंचनामा केला. याबाबत सोनई पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा: वडापावमुळे सापडले सोनई गावची झोप उडवणारे चोरटे

उत्तरीय तपासणी होवूनही मृतदेह ताब्यात न घेता सर्वांनी विहीर मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मंगळवारी रात्री केली. गुन्हा दाखल न केल्याने आज सकाळी नाथपंथी समाज संघटनेचे भाऊराव शेगर, पिराजी शिंदे, दया सावंत, शिवराम सावंत, अनिल शेगर, मोहन शेगरसह दोनशेहून अधिक समाज बांधवांनी सोनई पोलिस ठाण्यावर मोर्चा आणून ठिय्या अंदोलन केले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

हेही वाचा: सोनई गडाख बंधूंचीच आणि नेवासाही, सगळीकडे सोयीचे आरक्षण

येथील वातावरण काहीवेळ तणावपूर्ण झाले होते. अखेर पोलिसांनी अशोक, अजय, अभय नहार व त्यांच्या एका कामगारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. यानंतर सर्वांनी अंदोलन मागे घेवून मृतदेह ताब्यात घेतला. तब्बल २८ तासानंतर घोडेगावात अंत्यसंस्कार करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करत आहेत.

हेही वाचा: सोनई वगळता सर्व गावांची एकाच वेळी होणार मतमोजणी; तहसीलदार सुराणा यांची माहिती

घटनेची पाहणी केल्यानंतर सुरुवातीला अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला. नातेवाईक द्विधा मन स्थितीत होते. फिर्यादीनंतर लगेचच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

- रामचंद्र कर्पे, सहायक पोलिस निरीक्षक

विहिरीत बुडून मृत्यूमुखी पडलेल्या शिवाजी सावंतची परिस्थिती खूपच गरीबीची आहे. वृद्ध आई, वडील व तीन लहान मुले निराधार झाले आहेत. कुटुंबाचा आधार तुटल्याने सर्व समाज एकत्र येवून न्याय मागितला आहे.

- भाऊराव शेगर, सदस्य, नाथपंथी संघटना

(a young man has died after falling into a well in ghodegaon)

loading image