

“Disability Certificate Scandal: Startling Details Surface from Ahilyanagar District Hospital”
Sakal
अहिल्यानगर : जिल्हा परिषदेने दिव्यांग कर्मचाऱ्यांचे यूडीआयडी व दिव्यांग प्रमाणपत्र तपासले. सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांकडे ही प्रमाणपत्र होती. त्यातील साडेपाचशे कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात पुन्हा तपासणीसाठी पाठवले जाणार आहे. विशेष शिबिरांतून तालुका स्तरावर ही तपासणी करण्यात आली. जो कर्मचारी दिव्यांग प्रमाणपत्र दाखवतो. परंतु तो दिव्यांग वाटत नाही, तो रडारवर येणार आहे. तशा प्रकारची यादी तयार केली आहे.