Ahmednagar : पंचवीस कोटींचे ग्रंथालय उभारणार; सुजय विखे शब्दगंध साहित्य संमेलनाचा समारोप

महापालिकेने दिलेल्या जागेवर २५ कोटी रूपये खर्चून ही वास्तू उभारू.
sujay vikhe
sujay vikhesakal

अहमदनगर - जिल्ह्यातील साहित्यिक व वाचकांसाठी उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे ग्रंथालय उभारले जाईल. महापालिकेने दिलेल्या जागेवर २५ कोटी रूपये खर्चून ही वास्तू उभारू. त्यासाठी आमदार संग्राम जगताप व मी प्रयत्नरत आहे. आगामी सहा महिन्यांत हे ग्रंथालय पूर्ण होईल, असे आश्वासन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले.

पंधराव्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले होते. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, संमेलनाध्यक्ष डॉ. पुरूषोत्तम भापकर, स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप, घनश्याम शेलार, शब्दगंधचे सचिव सुनील गोसावी आदी उपस्थित होते.

खासदार विखे पाटील यांनी केलेल्या मिश्कील टिप्पणीला शेलार यांनी तिरकसपणे उत्तर दिले. साहित्य संमेलन आयोजित करणे हा कोणाच्या संगतीचा परिणाम वगैरे काही नसतो. आमदार जगताप यांनीही विखे पाटील यांचा संगतीचा मुद्दा खोडून काढला.

आयुर्वेद महाविद्यालयात आयोजित या संमेलनात विविध परिसंवाद झाले. त्यात राज्यभरातील ख्यातनाम साहित्यिकांनी हजेरी लावली. काव्यसंमेलनांनीही रंगत आणली. पुस्तक प्रदर्शन, ग्रंथविक्रीचे स्टॉलही रसिकांच्या गर्दीने फुलून गेले होते. त्यात लाखो रूपयांची उलाढाल झाली.

शेखर पाटील म्हणाले, नगर ही साहित्यिक, उद्योजकांची भूमी आहे. ज्ञानेश्वरीने संपूर्ण जगाला ज्ञान दिले. साहित्य हे आरसा असते. सदृढ समाजनिर्मितीसाठी साहित्य आणि संमेलनांची गरज आहे. त्याला राजाश्रय मिळायला हवा. पोलिसांमध्येही साहित्यिक दडलेला असतो. त्यांचे स्वतंत्र संमेलन आयोजित केले होते. त्यास उदंड प्रतिसाद मिळाला.

sujay vikhe
Satara Politics : दादांची 'दादागिरी' साताऱ्यात चालेल का ? पालकमंत्री पदावरून जोरदार चर्चा ...

उत्तरेत विखे, दक्षिणेत जगताप

उत्तर नगर जिल्ह्यात विखे पाटील घराण्याने साहित्याचा वारसा चालवला. दक्षिणेत गडाख कुटुंबाने ही साहित्य परंपरा जपली. त्यांच्यानंतर आता आमदार संग्राम जगताप ती पुढे नेत आहेत. त्यांनी आयोजित केलेले हे साहित्य संमेलन अनपेक्षित आहे. कारण त्यांचे कार्यक्रम म्हणजे क्रिकेट, दहीहंडी, गरबा, नवरात्रौत्सव असे होते. आता महायुतीच्या संगतीत राहून त्यांना साहित्याची गोडी लागलीय. कारण यापूर्वीच्या तीन वर्षांत त्यांना ते सुचले नाही, अशी कोपरखळी खासदार विखे पाटील यांनी मारली.

sujay vikhe
Chh. Sambhaji Nagar : दौलताबाद घाटात वाहतूक ठप्प; प्रवाशांना मनस्ताप, वाहनांच्या चार किलोमीटरपर्यंत रांगा

काका तुम्हीही भाजपात या

आमदार संग्रामभैया यांच्यावर भाजपच्या संगतीचा चांगला परिणाम झाला आहे. त्यांना साहित्याची गोडी लागल्याने भविष्यात ते नक्कीच एखादा ग्रंथही लिहितील. परंतु अरूणकाकांनीही भारतीय जनता पक्षात यावे, असे जाहीर आवाहनच खासदार विखे पाटील यांनी केले. त्यांच्या या जाहीर ऑफरमुळे संमेलनस्थळी हशा पिकला आणि चर्चाही रंगली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com