हा तर आदिवासी समाजाचे अधिकारी संपविण्याचा प्रयत्न

शांताराम काळे
Monday, 20 July 2020

अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांना लाचलुचपत सापळ्यात अडकविण्याचे मोठे षडयंत्र आहे. या षडयंत्राचा बोलविता धनी वेगळाच आहे.

अकोले (अहमदनगर) : अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांना लाचलुचपत सापळ्यात अडकविण्याचे मोठे षडयंत्र आहे. या षडयंत्राचा बोलविता धनी वेगळाच आहे. आदिवासी समाजाचे अधिकारी संपविण्याचे काम सुरू असून त्यामुळे आदिवासीच्या विकासाला खीळ बसणार आहे, आदिवासी समाजचे अधिकारी संबविण्याचा प्रयत्न करणारी प्रवृत्ती ठेचुन काढू, असा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने दिला आहे.

हेही वाचा : दुधाला ३० रुपये भाव द्या; नगर जिल्ह्यातून शेतकऱ्यांची आंदोलनाला सुरुवात
परिषदेचे मुंबई विभाग अध्यक्ष रामनाथ भोजने, पुणे विभाग अध्यक्ष गोविंद साबळे, नाशिक विभाग अध्यक्ष लकी जाधव यांनी याबाबत निववेदन दिले आहे. त्यात त्यांनी हा इशारा दिला आहे. अकोले तालुक्यात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे हे आदिवासी समाजाचे असून त्यांचा कौटुंबिक वारसा चांगला आहे. तीन वर्षापासून त्यांनी अकोल्यातील प्रशासन चांगल्याप्रकारे सांभाळले. कर्तव्यदक्ष अधिकारी, शिस्तप्रिय आणि कठोर प्रशासनामुळे काही ग्रामसेवक, पुढारी, ठेकेदार दुखावले गेले. यातील काही असंतुष्ठांनी एका ठेकेदारामार्फत लाचलुचपतचा अन्यायकारक सापळा रचून रेंगडे यांना गुंतवले आहे.

हेही वाचा : बापरे! पाथर्डी तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची शंभरी पार; १८ जण कोरोनामुक्त
रेंगडे यांच्या काळात तालुक्यातील घरकुले पाणीप्रश्न वैयक्तिक शौचालये, वयक्तिक लाभाच्या योजना वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण यासह गावातील अनेक सार्वजनिक अनेक योजना मार्गी लावल्या. त्यांचा जन्म आदिवासी समाजात झाला. जुन्नर पंचायत समिती व अमरावती सारख्या भागात त्यांनी उत्तम काम केले आहे. आदिवासी भागातील सर्व सामान्य लोकांचे प्रश्न, अडचणी त्यांनी जवळून अनुभवल्या आहेत. यामुळे कठोर प्रशासनातून आपल्या पदावरून करताना त्यांनी सर्व सामन्यांना न्याय देण्याचे काम केले. मात्र काहींना ते सहन झाले नाही. कामातून दुखावले गेल्याने त्यांना लाचलुचपतच्या खोट्याप्रकणात गोवण्यात आले. यातून तालुक्याच्या विकासाला खीळ बसणार आहे. आदिवासी समाजातील एका चांगल्या अधिकाऱ्यावर खोटे कुंभाड रचुन त्यांना गुंतवण्याचे काम काही विघ्नसंतोषी करत आहे. ते आदिवासी जनता कदापी सहन करणार नाही. त्यांना चोख उत्तर देऊन अशी प्रवृत्ती ठेचुंन काढू, असा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे मुंबई विभाग अध्यक्ष रामनाथ भोजने, पुणे विभाग अध्यक्ष गोविंद साबळे, नाशिक विभाग अध्यक्ष लकी जाधव यांनी दिला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All India Tribal Development Council warns of agitation in Akole