सरपंचांमुळेच कोरोनाची गावात एन्ट्री ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गावपातळीवर ग्रामसुरक्षा समिती स्थापन केली. त्यावर सरपंचांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. 

नगरः परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण करण्याची जबाबदारी ग्रामसुरक्षा समितीवर असताना काही सरपंच टाळाटाळ करीत असल्याचे प्रशासनाला निदर्शनास आले, अशा हलगर्जीपणा करणाऱ्या काही सरपंचांना कारवाई करण्यासंदर्भातील नोटिसाही बजावण्यात आल्या आहे. आता मात्र यापुढे दुर्लक्ष केल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी बजावले आहे. 

हेही वाचा ः ब्रेकिंग ः मुलगा म्हणतो, आईचे अनैतिक संबंध...नगर महापालिकेत आगडोंब 

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गावपातळीवर ग्रामसुरक्षा समिती स्थापन केली. त्यावर सरपंचांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. 

अवश्‍य वाचा ः गुडन्यूज...नगरमध्ये तब्बल इतक्‍या जणांची कोरोनावर मात 

परराज्यातून व जिल्हा बाहेरून आलेली व्यक्तीस संस्थात्मक विलगीकरण करण्याबाबतच्या सरपंचांना सक्त सूचनाही देण्यात आलेल्या होत्या. परंतु, काही ठिकाणी सरपंच तथा ग्रामस्तरीय सुरक्षा समिती बाहेरून आलेल्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करून संस्थात्मक विलगीकरण करण्यास टाळाटाळ करीत आहे. सरपंचांच्या या कुचराईमुळे गावात कोरोनाची एन्ट्री होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापूर्वी देखील निंबळक, जखणगाव, भोयरेपठार येथील सरपंचांना आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार फौजदारी गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, या आशयाच्या नोटिसाही बजावल्या आहे. मात्र, आता यापुढे ग्रामस्तरीय समितीचे अध्यक्ष तसेच सदस्य यांचा काही हलगर्जीपणा निदर्शनास आल्यास त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corana.s entry into the village due to the sarpanch