Diwali Festival 2020 : दिवाळीमुळे दिली जाणारी मिठाई, फराळ खाण्यावरही परिणाम

मार्तंड बुचुडे
Friday, 13 November 2020

दरवर्षी दिपावली निमित्ताने अनेक व्यावसायीक व अधिकारीही आपले हितचिंतक मित्र तसेच नातेवाईकांना व्यावसायीक संबध आपुलकी व प्रेम वाढावे तसेच त्या निमित्ताने शुभेच्छा देता याव्यात  यासाठी मिठाई, फऱाळ किंवा किंमती भेट वस्तू आपल्या कुवतीप्रमाणे वाटप करतात.

पारनेर (अहमदनगर) : दरवर्षी दिपावली निमित्ताने अनेक व्यावसायीक व अधिकारीही आपले हितचिंतक मित्र तसेच नातेवाईकांना व्यावसायीक संबध आपुलकी व प्रेम वाढावे तसेच त्या निमित्ताने शुभेच्छा देता याव्यात  यासाठी मिठाई, फऱाळ किंवा किंमती भेट वस्तू आपल्या कुवतीप्रमाणे वाटप करतात.

मात्र मिठाई कोणाकडून घ्यावी तसेच मिठाई वाटप केली तर ज्यांना दिली ते कोरोनाच्या भितीपोटी खाणार की फेकून देणार असे अनेक प्रश्न यावर्षी निर्माण झाले आहेत. त्यामुळे आता गोड स्वदिष्ट दिपावली मिठाई सुद्धा कोरोनाने कडू केली आहे. मिठाई वाटपावर कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे. 

हेही वाचा : Diwali Festival 2020 : विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून बनविले आकर्षक आकाशकंदील
भारतीय संसकृतीत दिपावली सण हा सर्व सणांचा राजा मानला जातो. दिपावली सण मोठा आनंदा नाही तोटा असे म्हटले जाते.  या सणाचा आनंद द्विगुणीत व्हावा या साठी आपले हितचिंतक मित्र नातेवाईतक ग्राहक  व्यावसायीक बधूंचे संबध द्रुढ व्हावेत एकमेकांची प्रेम अपुलकी वाढावी या साठी त्यांना दिपावली निमित्ताने मिठाईचे फऱाळेचे किंवा किंमती वस्तूंची वाटप केले जाते. अशा भेटी देण्याची फार पुर्वीपासून प्रथा आहे.

इतकेच नव्हे  घरगुती कौटुंबिक जिव्हाळा वाढाविण्यासाठी एकमेकांच्या शेजारी पाजारी राहाणारे सुद्धा घरी तयार केलेली मिठाई एकमेकांना अपुलकीने देत असतात. मात्र यंदा  कोरोनामुळे या मिठाई व फराळ वाटपावर संकट आले आहे. मिठाई वाटावयाची की नाही असा प्रश्न अनेकांच्या समोर उपस्थीत झाला आहे.

मिठाई किंवा फराळ देणे तसे फारसे खर्चिक नसते मात्र त्या वाटपातून एकमेकांचे प्रेमाचे संबध वाढतात अशी भावना अनेकांची आहे. शिवाय त्यात फारसे पैसे ही खर्च होत नाहीत.  मात्र  वस्तूरूप भेट देणे अनेकांना  परवडणारे नाही. म्हणून बहुतेकजण मिठाई वाटतात. कोरोनामुळे यंदा अनेकांना आपल्या प्रेमाच्या माणासांना मिठाई देता येणार नाही. त्यामुळे  स्नेहाच्या व प्रेमाच्या नात्यात कोरोनाने दुरावा निर्माण केला आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यावाठी येथे क्लिक करा
देशात व राज्यातही कोरोनाने धुमाकुळ घातला असून जग कोरोनाच्या प्रार्दुभाने हैराण झाले आहे. सध्या  कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे तरी साथ संपलेली नाही. त्यामुळे  मिठाईचे वाटप करण्यात अडचण आली आहे. इतकेच नव्हे तर कौटुंबिक स्नेहसंबध टिकाविण्यासाठी एकमेकांचे शेजारी राहाणारे  सुद्धा घरगुती केलेली मिठाई एकमेकांना आपआपसात एकमेकांना देतात. त्या निमित्ताने महिलांना एकमेकिंची वाहवा करण्याची संधी मिळत असते. तीसुद्धा अता मिळणार नाही. कोरोनामुळे मिठाई द्यावी का असा प्रश्न उपस्थी होत आहे.

कोरोनाच्या भिती पोटी आपण दिलेली  मिठाई आपले शेजारी खाणार का अशा शंका अनेकांच्या मनात येत आहे. एकमेंकाना तसेच पाहुण्यांना सुद्धा फराळ खाण्यासाठी बोलवावे का असा प्रश्नही अता निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा दिपावली निमित्ताने करण्यात येणा-या मिठाई वाटपात मोठी अडचण य़ेत आहे. कोरोणाच्या भिती पोटी मिठाई कोठे घ्यावी कोठे वाटावी व ती वाटली तर त्यातून कोरोणाचा प्रासार तर होणार नाही ना  अशी मानसीक भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दिपावलीची गोड मिठाई सुद्धा कोरोनाने कडू केली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Effect of coronavirus on Diwali