ग्रामपंचायत निवडणुकीचा एक्झिट पोल ऐकायचाय का, या मग पारावर

Exit poll of Gram Panchayat on social media
Exit poll of Gram Panchayat on social media

सोनई (जि.अहमदनगर) : कोणतीही निवडणूक असली की वाहिन्यांचे प्रतिनिधी तज्ज्ञांना सोबत घेत विजय-पराजयाचा अंदाज बांधतात. निवडणूक संपली रे संपली की एक्झिट पोलच्या आकड्यांवर चर्चा झडत असते. ग्रामपंचायत निवडणुकीत तसे होण्याची सुतराम शक्यता नसली तरी गावागावांतील पारावर आणि सोशल मीडियाच्या वॉलवरून गावगुंडी खेळणाऱ्या धुरिणांनी निवडणूक वार्तापत्र सुरू केले आहे. अंदाज अपना अपना अशा पद्धतीने हा एक्झिट पोल सुरू आहे.

ग्रामपंचायत मतदानाची टक्केवारी समोर ठेवून तालुक्यात 'अंदाज अपना अपना'सुरु झाला आहे. कमी-जास्त मतदानानुसार आकडेमोड करीत कार्यकर्ते एक्झीटपोल व्यक्त करीत आहेत. अंदाजातून पैजाही लागत आहेत.

काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ः सोनई- ६४.९१टक्के, चांदे - ७६.७१, भेंडा -६८.३४, कुकाणे - ७९.९४, बेलपिंपळगाव - ८०.९१, देवगाव - ८५.९१, प्रवरा संगम - ८५.३१ तर अनेक लहान गावातील मतदानाने नव्वदी ओलांडली आहे. तालुक्यात सर्वाधिक मतदान दिघी (९३.८९ टक्के) तर सर्वात कमी सोनई (६४.९१) झाले आहे.

प्रभाग आणि मतदान खोलीनुसार मतदानाचे आकडे समोर आल्यानंतर आता कार्यकर्त्यांची आकडेमोड सुरू झाली आहे. गल्ली, रस्ता व वस्तीवरील झालेले मतदान पाहता लगेचच विजयाचे आराखडे सुरू झाले आहे. रोख रकमेसह जेवणाच्या पार्टीवर पैजा सुरू झाल्या आहेत. सोमवार (ता.१८)पर्यंत
हा अंदाजपंचे कार्यक्रम करमणुकीचा ठरेल एवढे मात्र खरे.

तालुक्यात लोहगाव, तेलकुडगाव, बेल्हेकरवाडी,
लांडेवाडीसह अनेक लहान गावात चुरशीची निवडणूक झाली. शेवटच्या दोन दिवसांत अनेकांच्या विजयाचे गणित रात्रीच्या अर्थपूर्ण प्रचाराने कोलमडून 
जावू शकते. मतपेटीचा कौल कुणाला मिळणार याविषयी ग्रामस्थांत उत्सुकता लागली आहे. 
संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com