esakal | सालवडगावमध्ये यंदा प्रथमच भरलंय विविध रंगी पक्षी संमेलन
sakal

बोलून बातमी शोधा

For the first time this year a colorful bird convention has been held in Salwadgaon

समाधानकारक पावसामुळे यंदा ओसंडून भरलेल्या सालवडगाव (ता. शेवगाव) येथील तलावावर प्रथमच वेगवेगळ्या जातीच्या पक्षांचे संमेलन भरले आहे.

सालवडगावमध्ये यंदा प्रथमच भरलंय विविध रंगी पक्षी संमेलन

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : समाधानकारक पावसामुळे यंदा ओसंडून भरलेल्या सालवडगाव (ता. शेवगाव) येथील तलावावर प्रथमच वेगवेगळ्या जातीच्या पक्षांचे संमेलन भरले आहे. शेवगाव शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेल्या तलाव परिसरात भरलेल्या विविध रंगी पक्षांच्या मेळयामुळे पक्षी प्रेमींसाठी एक नवीन पर्वणी निर्माण झाली आहे. 

जायकवाडी धरणावरील पक्षी अभयारण्यातील बहुतांशी पक्षी या पाणथळ जागेत येवू लागल्याने तलाव परिसरात सकाळी संध्याकाळी हौशी पक्षी प्रेमींची गर्दी वाढू लागली आहे. जुनपासून यंदा तालुक्यात मोठया प्रमाणावर पाऊस झाल्याने लहान मोठे तलाव, बंधारे प्रथमच ओसंडून वाहत आहे. यामध्ये अनेक गावातील विस्मृतीत गेलेले तलाव, तळे पुन्हा यंदा पुनरुजीवीत झाले आहेत. नागलवाडी, गोळेगाव, खुंटेफळ, ठाकुरनिमगाव यासह अनेक तलाव तुडूंब भरले आहेत. 

हेही वाचा : तुकाराम मुंढे यांची शिर्डी येथे नियुक्ती करण्याची मागणी
चांगल्या पावसामुळे निसर्गाबरोबरच विविध पशू पक्षी, वनस्पती आदी जीवसंपदा बहरली आहे. पानथळ जागेतील किडे, आळ्या, वनस्पती आदी खादय असलेले पक्षी तलाव परिसरात येवू लागल्याने तेथे विविध जातीच्या पक्षांची मांदीयाळी सुरु झाली आहे. तालव काठावरील झाडे, झुडपे यांनी पक्षांना आश्रय दिल्यामुळे त्यांच्या किलबीलाटामुळे सकाळी, संध्याकाळी वातावरण चैतन्याने भारले आहे. शहरापासून आखेगाव रस्त्यावर अवघ्या तीन किमीवर असलेल्या सालवडगाव तलावाचा परिसर ही विविध रंगी व विविध जातीच्या पक्षांनी भरला आहे. त्यामुळे शहरातील पक्षी प्रेमींची पावले आपोआपच तिकडे वळू लागले आहे. सकाळी संध्याकाळी तेथे पक्षी निरीक्षणासाठी कँमेरा, दुर्बीण या लव्याजम्यासह हौशी लोकांची गर्दी वाढू लागली आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जायकवाडी धरणाच्या जलफुगवटा परिसरातील पक्षी अभयारण्यातून पाणथळ जागेतील भक्ष्य शोधण्यासाठी येणारे बहुतांश पक्षी या परिसरातही हजेरी लावू लागले आहेत. त्यामध्ये बदकाच्या जातीतील छोटी टिपुकली, हळदी कुंकू बदक, वारकरी, थापटया, बगळ्याच्या जातीतील भारतीय पानकावळा, लहान पानकावळा, ढोकरी, तर इतर जातीतील काळा शराटी, शेकटया, टिटवी, माळ टिटवी, तुतारी, शिक्रा, कोतवाल, चित्रबलाक, लालसरी, ब्राम्हणी डक, पांढ-या तु-याचा क्रौंच आदींसह इतर पक्षांच्या आवाजाने परिसराला एकखादया अभयारण्य व जंगलातील वातावरणाची अनुभूती येत आहे. 


मनावरील व शरिरावरील ताण हलके करण्यासाठी विविध रंगी व शारिरीक वैशिष्टयांनी नटलेल्या पक्षी पहायला मिळणे ही खुप मोठी नैसर्गिक उपलब्धता आहे. यंदा मुबलक पाण्यामुळे परिसरातील बहरलेली सजीवसृष्टी हौशी पशुपक्षी प्रेमींना खुणावते आहे. 
- डॉ. विक्रांत घनवट, अस्थिरोग तज्ञ तथा हौशी पक्षिनिरीक्षक, शेवगाव 

संपादन : अशोक मुरुमकर