
अहिल्यानगर: नगरकरांनी आज मोठ्या उत्साहात विघ्नहर्ता गणरायाचे स्वागत केले. शहरासह जिल्हाभर ढोल-ताशा, लेझीम, तसेच डीजेसह मिरवणूक काढत घरोघरी, तसेच सार्वजनिक मंडळांच्या मंडपात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते सकाळी प्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाच्या आगमनामुळे शहरासह जिल्हाभर मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.