
संगमनेर तालुक्यातील सावरगावच्या ग्रामस्थांनी नूतन कारभाऱ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले आहे. आता या नव्या कारभाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे.
संगमनेर ः भारतीय संसदेत प्रवेश करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नतमस्तक झाले होते. या त्यांच्या कृतीबाबत काहींनी टीकास्त्र सोडले तर काहींनी त्यांचे कौतुक केले. असाच काहीसा प्रकार नगर जिल्ह्यात झाला आहे. संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ या गावातील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची चर्चाच सर्वत्र आहे.
बिनविरोध निवडणुकीसाठी पोलिस पाटील गोरक्ष नेहे, संतोष फापाळे आणि डॉ. शंकर गाडे यांनी मुख्य समन्वयकाची भूमिका पार पाडली. त्यांना दोन्हीही गटातील सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
हेही वाचा - महाविकास आघाडीसाठी शरद पवारांनी टाकले फासे
या वेळी पाणी फौऊंडेशनचे राज्याचे मुख्य प्रशिक्षक संदेश कारंडे, विभागीय समन्वयक विक्रम फाटक, राजेंद्र जाधव, पोलिस पाटील गोरक्ष नेहे, वनपाल रामदास डोंगरे, विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शंकर गाडे, संतोष फापाळे, रवी नेहे, नामदेव थिटमे, पोपट थिटमे, राजाराम फापाळे, विलास नेहे, शंकर नेहे, हरीश्चंद्र नेहे, रावसाहेब थिटमे, परशराम नेहे, कारभारी गाडे, पत्रकार गोरक्ष नेहे, संदीप थिटमे, माधव नेहे, रमेश नेहे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्व सदस्यांचे गंगाजलाने पाय धुतले. झाडाचे रोपटे भेट म्हणून देत, वनसंपत्तीच्या रक्षणात अग्रेसर असलेल्या ग्रामस्थांनी वृक्षलागवडीचा संदेशही दिला आहे. चुरशीच्या निवडणुकांमुळे गावात मोठ्या प्रमाणात गटातटाचे राजकारण होते. मतदानासाठी दारू व पैसा यांचा वापर झाल्याने व्यसनाधिनता वाढते. संस्कारांचा लोप होतो व गावातील सामाजिक सौहार्द कमी होवून त्याचा परिणाम विकास कामांवर होतो.
हेही वाचा - मतदारांना वाटलेल्या पैशांच्या वसुलीसाठी पराभूतांची उमेदवारांकडून दमदाटी
या गावाने मागील काळात जलसंधारण, मृदसंधारण आदींसह अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. राजकीय कटूता टाळून, दोन गटातील गावाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी
हा आहे उद्देश
भारतीय संस्कृती व धर्मशास्त्रानुसार गंगाजलाला पवित्र मानले जाते. गावाच्या विकासाच्या वाटचालीत महत्वाचा पाया असलेल्या ग्रामसंसदेवर निवडून आलेल्या सदस्यांनी पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळात, पवित्र गंगाजलाप्रमाणे वागून, स्वार्थविरहीत विकासगंगा गावात आणावी या हेतूने, गुलाब पाकळ्या टाकलेल्या गंगाजलाने नवनिर्वाचित सदस्यांचे पाय धुवून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.