Gauri Ganpati : परित्यक्तांना गौरींच्या हळदी-कुंकवाचा मान

सुहासिनी कोयटे यांच्या संकल्पनेतून उपक्रम
ganeshotsav
ganeshotsavsakal

कोपरगाव - परित्यक्ता महिलांना गौरींच्या हळदी-कुंकू समारंभात सहभागी करून कोयटे परिवाराने आगळ्यावेगळ्या पद्धतीने गौरीपूजन साजरे केले. माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. बहात्तर वर्षांची परंपरा असलेल्या या गौरींजवळ यंदा नारीशक्तीचे प्रतीक असलेल्या महिषासुरमर्दिनीचा देखावा साकारण्यात आला होता.

कोयटे म्हणाल्या, की परित्यक्ता महिलांना सणवार व हळदी-कुंकू समारंभात सहभागी करून घेण्याबाबत माझे पती व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे आग्रही असतात. यंदा गौरीपूजनाच्या निमित्ताने आयोजित हळदी-कुंकू समारंभात परित्यक्ता महिलांना निमंत्रित करण्याचा उपक्रम राबविण्याचे आम्ही ठरविले.

समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी संचालक स्वाती कोयटे यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. या समारंभात अन्य महिलांप्रमाणेच परित्यक्ता महिलांचा सन्मान करण्यात आला. त्याही आनंदाने सहभागी झाल्या. एक हजाराहून अधिक महिलांना निमंत्रित करण्यात आले होते.

ganeshotsav
Pune Ganeshotsav : तंदुरुस्त बंदोबस्तासाठी पोलिसांना चिक्की वाटप

परित्यक्ता महिलांनादेखील समाजात मानसन्मान मिळावा, असा संदेश देण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला. या महिलांना हळदी-कुंकू लावण्यास प्रोत्साहित करणे आणि अनिष्ट रूढी-परंपरांना फाटा देणे हा उद्देश त्यामागे होता. तो एका अर्थाने सफल झाला. गौरींसमोरची आरास करताना फुलांची आरास करण्यात आली. केळीच्या पानांचे प्रवेशद्वार हे यंदाच्या सजावटीचे आकर्षण ठरले.

-स्वाती कोयटे

ganeshotsav
Ahmednagar Crime : धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाचा खून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com