
जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती व लसीकरणाबाबतचा आढावा जिल्ह्याचे पालक सचिव आशिषकुमार सिंह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला.
अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती व लसीकरणाबाबतचा आढावा जिल्ह्याचे पालक सचिव आशिषकुमार सिंह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांना तपशीलवार माहिती दिली.
हे ही वाचा : अधिकारी अन् कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण
अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान, नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उर्वरित बांधकामासाठी लागणारा निधी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, भूसंपादन, पर्यटन, इमारत बांधकाम, प्रस्तावित पोलिस ठाण्यांची मान्यता, घरकुल योजना आदींबाबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी माहिती दिली. जिल्ह्यासाठी विविध योजनांसंदर्भात आपण तातडीने पाठपुरावा करू. त्या अनुषंगाने परिपूर्ण माहिती संबंधित विभागाकडून घेऊन सादर करण्याची सूचना सिंह यांनी केली.
हे ही वाचा : मकरसंक्रांतीनंतरच निधी समर्पण मोहीम : महेंद्र वेदक
जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती संकलित केली असून, पहिल्या टप्प्यात या कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. तसेच, 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहिमेर्तंगत 60 वर्षे वयोगटातील नागरिक आणि को-मॉर्बिड नागरिकांची माहितीही आरोग्य विभागाकडे आहे. त्यामुळे पुढच्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.
हे ही वाचा : शेवगाव तालुक्यात 843 जण रिंगणात
दरम्यान, जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधितांसाठी पहिल्या टप्प्याचे 73 कोटींचे अनुदान प्राप्त झाले असून, उर्वरित अनुदान मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. जिल्हाधिकारी इमारतीचे बांधकामासाठी अजून 12 कोटींची गरज आहे. पर्यटनाच्या विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जवळपास 80 कोटींची आवश्यकता असून, त्यासाठी संबंधित राज्यस्तरीय विभागांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे डॉ. भोसले म्हणाले.