Balasaheb Thorat
संगमनेर : सिद्धेश सूरज कडलग या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. यानंतर ग्रामस्थ व संगमनेर तालुक्यात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली.