
श्रीगोंदे : महिन्याला सहा ते आठ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून ७३ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी नितीन अंबादास गांगर्डे (रा. मांदळी, ता. कर्जत) यांच्या फिर्यादीवरून इन्फनेट बिकन कंपनीच्या बारा संचालकांविरुद्ध श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.