

Jammu Airport Flight Scare Raises Tension as Poor Runway Visibility Prevents Pilot From Landing With Ahmednagar Passengers
sakal
-नितीन देशमुख
नगर तालुका: वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या अहिल्यानगरच्या भाविकांचा विमानप्रवास जम्मू विमानतळावरील खराब हवामानामुळे थरारक ठरला. ढगाळ वातावरण, मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे विमान उतरविण्याचे सलग प्रयत्न अयशस्वी ठरत होते. विमान हवेत घिरट्या घालत असताना प्रवाशांच्या मनात भीतीचे काहूर झाले होते. मात्र, वैमानिक कॅप्टन समीर मल्होत्रा यांच्या कुशलतेमुळे चौथ्या प्रयत्नांत विमान जम्मू विमानतळावर सुखरूप उतरवले आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला.