

Big Political Move in Maharashtra: Shiv Sena Takes Action in Ahilyanagar Unit
sakal
श्रीरामपूर: अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या (शिंदे गट) अंतर्गत गटबाजीची आणि विस्कळीतपणाची गंभीर दखल घेत, उद्योगमंत्री तथा जिल्हा संपर्कमंत्री उदय सामंत यांनी संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी तडकाफडकी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शिवसेना, युवासेना, महिला आघाडीसह सर्व अंगीकृत संघटनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आगामी काळात नवीन कार्यकारिणी जाहीर होईपर्यंत जिल्ह्याची धुरा प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून नितीन औताडे, कमलाकर कोते, बाबूशेठ टायरवाले आणि अनिल शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.