अहमदनगर : आजिनाथ भोसलेच्या टोळीला मोक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime
अहमदनगर : आजिनाथ भोसलेच्या टोळीला मोक्का

अहमदनगर : आजिनाथ भोसलेच्या टोळीला मोक्का

अहमदनगर : अहमदनगर आणि बीड जिल्ह्यात चोऱ्या, घरफोड्या, रस्ता लूट, दरोडे टाकणाऱ्या आजिनाथ विलास भोसले (वय २२, रा. हातवळण दाखले, ता. आष्टी) याच्यासह पाच जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायदा (मोक्का) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.(Mocca to Ajinath Bhosale gang)

हेही वाचा: अहमदनगर : मुलाच्या लग्नात गर्दीमुळे कर्डिलेंना दहा हजारांचा दंड

नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ता. १ ऑगस्ट २०२१ रोजी पडलेल्या दरोड्यात आजिनाथ भोसले टोळीचा समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले. नगर तालुका पोलिसांनी मोक्काअन्वये कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी हा प्रस्ताव नाशिक परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्याकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला होता. शेखर यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली.(Ahmednagar news)

हेही वाचा: उद्योजक विलास उंबरकर यांना 'महाराष्ट्राची गिरीशिखरे' पुरस्कार

भोसले याच्या टोळीतील कृष्णा विलास भोसले (वय २२), सुरेश पंजाराम काळे (वय ३८, रा. सोनविहिर, ता. शेवगाव), पवन युनूस काळे (रा. गुणवडी, ता. नगर) आणि रावसाहेब विलास भोसले (वय ४०), भरत विलास भोसले (दोघे रा. हातवळण दाखले, ता. आष्टी) यांच्यावर मोक्का अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या टोळीने अहमदनगर आणि बीड जिल्ह्यात नऊ गंभीर गुन्हे केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.(mocca against criminal)

हेही वाचा: उद्योजक अशोक खाडे यांना सांगली भुषण पुरस्कार 

आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या आणि एक दरोडा, अंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक रस्ता लूट आणि एक दरोडा टाकला आहे. शेवगाव हद्दीत एक खून, कोतवाली हद्दीत घरफोडी आणि श्रीगोंदे हद्दीत रस्ता लूट केल्याचे निष्पन्न झाले आहे.

तीन भावांचा समावेश

अजिनाथ भोसले याच्या टोळीमध्ये सर्वजण एकमेकांचे नातेवाईक आहेत. अजिनाथ भोसले या टोळीचा प्रमुख आहे. गुन्हा करण्याचे नियोजन तो करीत होता. त्याचे साथीदार त्यांना सोपविलेली जबाबदारी पार पडत होते. रावसाहेब आणि भरत या दोन भावांची त्याला साथ मिळत होती.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top